जनता विद्यालयात निकिता भानवसे पहिली सुनील धोत्रे दुसरा तर सानिका कासवेद तिसरी
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी संचलित जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी या शाळेच्या निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे. सन 2023-24 या सालाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत निकिता सोमनाथ भानवसे 87% गुण घेऊन प्रथम आली आहे. सुनील चंद्रकांत धोत्रे 86.20% गुण घेऊन द्वितीय आला आहे. सानिका खंडू कासवेद हिने 84.20 टक्के गुण घेऊन विद्यालयात तिसरी आली आहे. याचबरोबर जान्हवी सौदागर गोंदील 81.20%, प्रगती सोमनाथ होनराव 79.80%, प्रतिभा दत्तात्रय गरडकर 79.20%, व सारिका गणपत पाटील 78 45 टक्के गुण घेऊन यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मुस्ताक शेख, सचिव विलास देशमुख, माझी सचिव विलास राजमाने व आजी-माजी सर्व संचालक मंडळ याचबरोबर शाळेचे प्र.मुख्याध्यापक डी.बी गायकवाड, जेष्ठ शिक्षक सादिक मोमीन, राजशेखर महामुनी, सविता जगताप, वसंत सरपने, सूर्यकांत पाटील, विकास साठे, सचिन चव्हाण, गणेश माढेकर, विशाल निकम, दिनेश बंडगर, सुनील गायकवाड, अमिर आवटे, तुकाराम बिबे, मारुती सूर्यवंशी, अभय यादव याचबरोबर इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शाळेचे पालक यांनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा