Breaking

सोमवार, १४ जुलै, २०२५

प्रवीण गायकवाड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा व बहुजन बांधवांच्या वतीने निषेधार्थ मोर्चा*


*प्रवीण गायकवाड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा व बहुजन बांधवांच्या वतीने निषेधार्थ मोर्चा* 


करमाळा प्रतिनिधी 
प्रविणदादा गायकवाड यांचेवर झालेल्या हल्याच्या निषेधाबाबत सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांना निवेदन देण्यात आले
          सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा यांचे वतीने विनंती व इशारा करतोत की, काल अक्कलकोट येथे संभाजी बिग्रेडे चे नेते प्रविण दादा गायकवाड यांचेवर दिपक काटे व अन्य संबंधित यांनी खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्यातून प्रविणदादांना शाई लावण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा आम्ही जाहीर तीव्र शब्दांत निषेध .तसेच प्रविणदादा गायकवाड यांना धक्काबुक्की करणे, हाताने मारहाण करणे, गाडीवर दगडफेक करणे व जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशी घटना घडली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बहुजन समाजातील तरूणांना उद्योगाची वाट दाखविणारे पुरोगामी विचारांचे प्रविणदादा गायकवाड यांचेवर झालेला हल्ला निषेधार्त आहे. आरोपींवर तात्काळ मोक्का अंतर्गत व तडीपार सारख्या सक्त कलमे लावून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा यांच्या वतीने करण्यात येत आहे. शाई फेक करणारा दिपक काटे हा खुनी आरोपी असून त्याने स्वतःच्याच भावाचा खुन केला होता हे सत्य आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये प्रविणदादा गायकवाड यांना गृहमंत्रालय यांनी संरक्षण द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे यावेळी सकल मुस्लिम समाज सकल धनगर समाज व आंबेडकरवादी चळवळ करमाळा भीम आर्मी रासप बहुजन संघर्ष सेना आदी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा व्यक्त केला.
 यावेळी मोठमोठ्याने घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला व करमाळा शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा