संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही –
मार्च अखेर संपूर्ण ऊसाचे गाळप होणार
आ.बबनराव शिंदे
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2023-24 गळीत हंगाम चालू असून या दोन्ही कारखान्याचे कार्यक्षेत्रातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी यांचे संपूर्ण ऊसाचे गाळप होणार असून संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत अशी माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 व 2 कारखान्याचा सन 2023-24 गळीत हंगाम सुरू असून या हंगामातील सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे संपूर्ण ऊसाचे गाळप होणे आवश्यक असून व्यवस्थापनाने गाळपाचे जरूर ते नियोजन केलेले आहे.
केंद्रशासनाचे ज्यूस टू इथेनॉल उत्पादन बंदीचे आदेशामुळे युनिट नं.1 कडे प्रतिदिन 3000 मे.टन व युनिट नं.2 कडे प्रतिदिन 500 मे.टन असे एकूण प्रतिदिन 3500 मे.टन ऊस गाळप कमी होत आहे. या निर्णयामुळे कारखान्याचे 3 लाख मे.टनाने गाळप कमी झालेले आहे.वास्तविक 10 मार्च पर्यंत गाळप हंगाम संपणे अपेक्षीत होते. प्रतिदिन ऊस गाळप कमी होत असल्याने गाळपाचे दिवस वाढून हंगाम लांबणीवर जात आहे. तसेच दरम्यानचे काळात पाऊस पडल्याने ऊसाचे टनेजमध्ये वाढ होवून हेक्टरी ऊस उत्पादन वाढले आहे. ऊसाचा हेक्टरी उतारा वाढला आहे.
चौकट-
युनिट नं.1 व 2 चे कार्ययक्षेत्रातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी यांचे संपूर्ण ऊसाचे गाळप मार्च 2024 अखेर पर्यंत होणार असून संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. –आ.बबनराव शिंदे
बेंबळे प्रतिनिधी
चौकट-
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 व 2 युनिटचे मिळून आजअखेर 22 लाख 13 हजार 449 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे कडे 1 ते 10 मार्च 2024 या कालावधीत गाळपास आलेल्या सर्व ऊसास जाहीर केलेप्रमाणे प्रति टन रू.150/- अनुदानासह प्रति टन रू.2850/-प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापोटी कारखान्याने 44 कोटी 32 लाख बँकेत जमा केले आहेत. 16 ते 29 फेब्रुवारी या कालावधीचे तोडणी वाहतूक बिलापोटी कारखान्याने 15 कोटी 47 लाख बँकेत जमा केले आहे. –आ.बबनराव शिंदे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा