Breaking

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

बेंबळेच्या रोहिदास भोसले यांची कृषी सहाय्यक पदी निवड..



बेंबळेच्या रोहिदास भोसले यांची कृषी सहाय्यक पदी निवड..


बेंबळे (प्रतिनिधी)
बेंबळे येथील रहिवासी असलेले रोहिदास दत्तात्रय भोसले यांची Mpsc-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  कोल्हापूर विभागातून कृषी सहाय्यक पदी निवड झाली. रोहिदास हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्याची घरची परिस्थिती तशी बेताची त्याच्या शिक्षणासाठी आई व वडील यांनी अपार कष्ट घेतले प्रसंगी त्यांनी इतरांच्या शेतात मोल मजुरी करून रोहिदास ला शिकवले. रोहिदास मिळालेले यशाच्या संपूर्ण श्रेय माझ्या आई-वडिलांचे असल्याचे त्यांनी सांगितले .  रोहिदासचे दहावीपर्यंतचे शिक्षण श्री .विमलेश्वर विद्यालय बेंबळे येथे झाले व अकरावी बारावी सायन्स बी ग्रुप इंग्लिश मीडियम स्कूल माळीनगर येथे झाले. पुढील  शिक्षण बी.एस.सी .अँग्री महात्मा फुले कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. डिग्री घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पुणे येथे राहून 3 वर्षे  व कृषी विद्यापीठ राहुरी येथे 7 वर्षे राहून अभ्यास केला. अशाप्रकारे आर्थिक परिस्थिती नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कष्ट, मेहनत, सातत्य ,संघर्ष जोरावर यश संपादन केले. रोहिदास ला मिळालेल्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा