*राज्यस्तरीय मराठा समाज वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन*
टेंभुर्णी/प्रतिनिधी
सध्याच्या धगधक त्या जीवनात माणूस स्वतःला हरवत चालला असून जुन्या रूढी परंपरा विसरून प्रत्येक जण सोशल मीडियामुळे जनसंपर्क कमी झाला असून त्यामुळे एखादी वधु जवळ असली तरी कळत नाही व वर असला तरी समजून येत नाही त्यासाठी आम्ही डायरेक्ट जनसंपर्क होण्यासाठी राज्यस्तरीय मराठा वधु वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले आहे जेणेकरून दिवसभर चर्चा करता येईल त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारे
तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात महाराष्ट्र सोयरीक ग्रुपच्या वतीने विनाशुल्क राज्यस्तरीय भोजनव्यवस्थेसह
लोक सहभागातून वधु वर परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानचे कै. बाळासाहेब
( कल्याणराव) इंगळे पॉलिटेक्निकल कॉलेज सभागृह गाणगापूर रोड ,अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 पर्यंत आयोजित केला आहे राज्यस्तरीय मराठा वधू-वर थेट भेट मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती बागल सर यांनी दिली.
याबाबत ते म्हणाले की राज्यातील भव्य दिव्य वधु वर मेळावा होणार असल्याचे मराठा सोयरीक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नागनाथ बागल यांनी सांगितले
मेळाव्याचे नियोजनासाठी अक्कलकोट येथील
श्री राम(भाऊ )जाधव श्री राजेंद्र सुरवसे श्री अतुल जाधव
श्री अमर शिंदे श्री बापूजी निंबाळकर श्री स्वामीराव सुरवसे महाराष्ट्र सोयरीचे उपाध्यक्ष श्री मनोज गोरे पंकज पिंगळे हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा