Breaking

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

सहारा सर्वांगीण विकास संस्थेचा मिळून साऱ्याजणी रक्षाबंधन कार्यक्रम उत्सहात साजरा.



सहारा सर्वांगीण विकास संस्थेचा मिळून साऱ्याजणी रक्षाबंधन कार्यक्रम  उत्सहात साजरा.
                             

                    श्रीगोंदा-  नितीन रोही,                 ***
सहारा सर्वांगीण विकास संस्था आणि संविधान गट यांच्या संयुक्त विद्यमाने आज लोणी व्यंकनाथ येथे मिळून साऱ्याजणी या कार्यक्रमात महिलांनीच महिलांना राख्या बांधल्या आणि रक्षाबंधन साजरा केला.



या कार्यक्रमामध्ये आपलेपणाची भावना, आपुलकी , नात्यात बांधले जाणे , एकमेकांचे रक्षण करणे.   विधवा महिला , परितक्त्या महिला, कुमारी माता, गरीब आणि गरजू महिला या महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असते. एक महिला म्हणून आपल्याला तिचा आदर कसा करता येईल, तिचं प्रमोशन कसं करता येईल, त्यांच्या  संवर्धन आणि रक्षणाचे जबाबदारी आज आपण घेत आहोत असे बोलताना सहारा सर्वांगीण विकास संस्थेच्या सचिव छाया भोसले म्हणाल्या आणि पाच गर्भवती महिलांच्या गर्भाचे संरक्षण आणि पाच एकल महिलांना महिलांनीच  राख्या बांधल्या आणि संरक्षणाची शाश्वती दिली.
आपण काहीच करू शकत नाही हे मनातून काढून टाका महिलांनी स्वतःच्या आरोग्य कडे लक्ष दिले पाहिजे महिलांकडे खूप चांगले गुण असतात पण समाजाला ते दबगतात .बारा हाडे तुटावीत इतका त्रास सहन करून डिलिव्हरी करणाऱ्या आपण महिला मग सहनशीलता आपल्यात कुठे कमी आहे असे बोलताना डॉ. प्रनोती माई जगताप म्हणाल्या. असे कमी पुरुष असतात की जे स्वतः अंधारात राहून बायकोला प्रकाश देतात. कुंडली बघताना नवरा बायकोची नव्हे तर सासु सुनेची बघा तरच महिला कुटुंबात सुखी राहील. महिला स्वतःच्या पायावर उभे असून सुद्धा आत्महत्या का करतात असा सवाल कार्यक्रमात सुवर्णाताई  पाचपुते यांनी केला. उर्मिला  जठार, सहारा संस्थेच्या विश्वस्त संध्या काकडे, सुनिता उंडे, संगीता घोडेकर, मोनिका गोरखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नीता जठार, अपेक्षा जठार, पूजा साळवे, मीरा शिंदे, प्रमिला काकडे, वैशाली मेरूकर, सुषमा खलाटे, प्रतिभा पवार, शारदा पवार, कल्पना जठार, राणी मदने, सुलभा डांगे, जयश्री बोटे, प्रियंका काकडे, मीरा काकडे , काजल काकडे, सुजाता काकडे, प्रमिला काकडे, शुभांगी बरकडे या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया भोसले तर आभार सहारा संस्थेचे विश्वस्त संध्या काकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संध्या काकडे, नीता जठार, अनुराधा काकडे, पूजा साळवे, छाया भोसले यांनी प्रयत्न केले अशी माहिती सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा