Breaking

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

महाड तालुक्यात 134. ग्रामपंचायतींचा कारभार 58 ग्रामसेवकांच्या हाती!76 ग्रामसेवकांच्या रिक्त पदामुळे प्रशासनाच्या कारभारावर अतिरिक्त ताण? ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे 95 टक्के ग्रामपंचायत भ्रष्टाचाराने बरबटल्या?



महाड तालुक्यात 134. ग्रामपंचायतींचा कारभार 58 ग्रामसेवकांच्या हाती!
76 ग्रामसेवकांच्या रिक्त पदामुळे प्रशासनाच्या कारभारावर अतिरिक्त ताण? 
ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे 95 टक्के ग्रामपंचायत भ्रष्टाचाराने बरबटल्या ?

महाड- (मिलिंद माने)

महाड तालुक्यांमध्ये एकुण १३४ ग्रामपंचायती असुन या पंचायतीच्या माध्यमांतुन गावांतील नागरिकांची महत्वाची शासकीय कामे केली जातात,परंतु . राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असुन  मागील दोन वर्षापासून 58 ग्रामसेवकांच्या हाती 134 ग्रामपंचायतींचा कारभार चालू असून तालुक्यातील 76ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेंत. या रिक्त ग्रामसेवकांच्या पदांमुळे 95 टक्के ग्रामपंचायती भ्रष्टाचाराने बरबटल्या असल्याचे विदारक चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे 

. ग्रामसेवकांच्या रिक्त पदांप्रमाणे विस्तार अधिकार्‍यांची तीन पदे  असुन त्या पैकी एक पद रिक्त आहे.अश्याच प्रकारे अन्य विभागांमध्ये देखिल रिक्त पदे असल्यामुळे ग्रामिण भागांतील ग्रामपंचायतच्या प्रसायकीय कामावर त्याचा विपरीत परिणाम झाला असुन रिक्त पदांमुळे कामकाज ठप्प झाल्याचे चित्र महाड पंचायत समितीमध्ये पाहण्यात मिळत आहे

       शासनाच्या प्रत्येक विभागांमध्ये महत्वाची पदे गेल्या दोन वर्षापासून रिक्त असल्याने त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होत असुन सर्व सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेंत.शहरी भागा पेक्षा ग्रामिण भागांतील प्रसायकीय कामावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

      शासनाच्या प्रत्येक विभागांमध्ये महत्वाची असणारी सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे होत नाहीत.शहरी भागा पेक्षा ग्रामिण भागांतील जनतेची अक्षरश: शासना कडून पिळवणुक केली जात आहे. तालुक्यामध्ये १३४ ग्रामपंचायती आहेंत त्याच बरोबर महसुली गावांची संख्या 188 आहे महाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागाची लोकसंख्या 2011 च्या तुलनेत138955. असून पुरुष91457,. तर स्त्रिया88374. तर महाड तालुक्याचे क्षेत्रफळ796.67चौरस किलोमीटर आहे महाड तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण 81.90% आहे यामध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण 79.46% तर महिला साक्षरतेचे प्रमाण 67.22% त्याचप्रमाणे सहा वर्षाखालील बालकांची संख्या19o44. तर सहा वर्षा पर्यंत मुलांची संख्या9787. व मुलींची संख्या9257. आहे महाड तालुक्यात नऊ मंडळी असून तलाठी सजा ची संख्या 51 आहे  

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे अनेक  गावांतुन जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील पदे रिक्त असल्यामुळे सर्व सामान्यांना अर्थिक नुकसानी बरोबर तालुक्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी यावे लागत असल्याने नाहक वेळ व पैसा खर्च होऊन आर्थिक तोटा नागरिकांना सहन करावा लागत आहे

महाड तालुक्यातील ग्रामसेवकांच्या हाती कोणत्या ग्रामपंचायतीचा कार्यभार आहे त्याची यादी पुढील प्रमाणे;
प्रवीण बाळाराम शिंदे (ग्राम विस्तार अधिकारी). दासगाव, पडवी ,तळीये,8805624688,
प्रदीप संभाजी महामुंण कर. (ग्राम विस्तार अधिकारी). खरवली7507093176
अन्या महादू दरवडा वाघोली ,दहिवड, मांगरूण9850524761
नितेश मच्छिंद्र सातव. चाडवे खुर्द8087999888
शिवाजी दादासाहेब बंडगर कांबळे तर्फे बिरवाडी ,रानवडी खुर्द9922693181
संदीप अरविंद बागडे तळोशी ,वरणडोली, नांदगाव खुर्द9422693181
गोरक्ष निवृत्ती देशमुख मु मुशी ,किये  निगडे, पिंपळकोंड8087122874
भाविका भरत कदम कोकरे तर्फे नाते कोंझर7517234051
आला शिंग भिका राठोड विन्हेरे  भोमजई, घावरे कोंड ,रावतळी9420338326
सुभाष दत्तात्रेय चव्हाण गोठे बुद्रुक ,सिंगर कोंड942160207
सुशांत तुकाराम चिले नडगाव तर्फे बिरवाडी, चांभार खिंड9881418184
प्रकाश सुंदर नाडकर जिते ,धामणे8975821082
विशाखा वासुदेव सोंडकर शिरसवणे, शिरवली9028748264
रत्नाली रविचंद्र मालगुणकर दादली, उंदेरी8087585827
वैशाली गोविंद नागे सोनघर ,कुंबळे 7666591927
नितीन अंकुश पवार कोंडीवते8208295534
चंद्रकांत सजनू कदम कोळसे, नांदगाव बुद्रुक8805452471
चंद्रकांत दामू अर्बन टोळ बुद्रुक  ,केभुर्ली9049728861
गायत्री सुभाष गीर गोसावी रेवतळे ,कावळे तर्फे विन्हेरे ,नागाव9404794564
आर .एस .पवार.अधि स्ते, वलंग  शिरगाव8087882778
परमेश्वर तुकाराम तिडके नरवण  खुटील ,भेलोशी8805483253
बळीराम व्यंकटराव मंगनाळे सवाने9960004647
अजित वसंत पोळेकर आडी ,वीर7249022409
अंजनाबाई नरहरी खरात धुरूपकोंड  कुरले.9028502878
मंजुषा मधुकर खोपडे पार्माची ,भावे8805849679
राखी रविकांत बुटाला . चाडवे बुद्रुक ,वडवली, चोचिंदे9404992241
. मीनाक्षी सुरेश मोहिते शेल, आकले ,कांबळे तर्फेमहाड8668856578
किशोर गेनू मांडवकर गोंडाळे ,मोहपरे ,आ चलोली9850700567 कुंभे शिवथर, कसबे शिवतर  आंबे शिवतर,.7278017043
विजय दगडू जाधव निजामपूर ,नेराव, बावळे7276817077
जय मला जगन्नाथ पाटणे करंजखोल, किंजळोली बुद्रुक9420057316
. सतीश भास्कर चेंडके लाडवली, वरद, बारसगाव.9403934520
सिद्धी शेखर पाटेकर सव, रावढळ, नडगाव तर्फे तुढील.9975658836
अंबालाल धाकल्या बागुल जुई बुद्रुक चिंबावे राजेवाडी9527025298
नागनाथ अरुण घाडगे आमशेत, वहूर, बिरवाडी.9594446286
योगिता रमेश पलंगे कोंल,साकडी, कोठेरी.7083047473
संजय लक्ष्‍मण जाधव पाचाड ,पुनाडे तर्फे नाते, कोथुर्डे8698640095
सुवर्णा धावजी उंबर साडा नाते, चापगाव.8408997928
विनायक काशिनाथ मेंडके मोहोत, कुसगाव, पिंपळवाडी, रुपवली.9503559123
प्रसाद गोंधळी काचले, किंजळोली खुर्द9527029364
प्रवीण बुल्लू वामने, कुंभार्डे ,आंबिवली बुद्रुक, अंबावडे.7066732097
भीमराव संभाजी पंडित मांडले ,खर्डी.8329409629
कैलास ईसऱ्या राऊत तेलंगे ,तेलंगे मोहल्ला7588734749
गजानन गाढवे पंदेरी, नातोंडी ,दापोली9637221531
अनिल रमेश तांकपेरे करंजाडी ,पांगारी ,बीज घर7218555173
महादेव नारायण मोरे वाकी बुद्रुक, वारंगी, पाने.9552608004
संजय विलास साळे अप्परतुडील, लोअर तुडील.9022622883
महादेव निवृत्ती भरगुडे ताम्हणे, फाळकेवाडी, व साप.7757810243
संतोष रामदास तायडे आसनपोई ,तेठघर.7798599951
मोती सिंग लहानोजी भस्मे वराठी ,चिंबावे मोहल्ला.9922462582
राजकुमार सदाशिव जाधव9403091135
उद्धव सखाराम केदार राजीवली7350617777
मयूर कांबळे वाळण बुद्रुक8956030487
स्वप्निल नगरकर दाभोळ9004992242
अश्विनी दत्तात्रेय काळे किंजल घर9850145768
नयन पाटील गांधार पाले9076902273
मनीष कदम सादोशी, . सावरट9403313971
अनिल रमेश मोरे वाळसुरे9552887348


 शासकीय कामानिमित्त  कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारुनही कामे होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून केल्या जातात परंतु स्थानिक लोक प्रतिनिधी त्याच बरोबर उच्च पदस्थ अधिकारी सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्या ऐवजी अपमानास्पद वागणूक ग्रामीण भागातील नागरिकांना देखील देत आहेत. व त्यांच्या समस्या सोडविण्याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येते.
महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना आपली गाव पातळीवर कामे पुर्ण होण्या करीता ग्रामसेवकाचेपद नियुक्त करण्यांत आले. प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवका कडून जन्म मृत्यु दाखला,रहिवासी दाखला,बांधकामाचे परवाने त्याच बरोबर कर वसुली, गावातील स्वच्छता दिवाबत्ती इत्यादी महत्वाची कामे केली जातात.गाव पातळीवर मुलभूत सुविधांकडे लक्ष देण्याचे महत्वाचे काम ग्रामसेवका कडे देण्यांत आलेले आहे.परंतु प्रत्यक्षांत तालुक्यामध्ये 76 ग्रामसेवकांचीपदे रिक्त असल्यामुळे एका ग्रामसेवका कडे तीन ते चार गावांचा पदभार सोपविण्यांत आलेला आहे.. हे ग्रामसेवक चार चार पंचायती मधुन काम करीत असल्याने नागरिकांना मात्र ग्रामसेवकाची भेट होणे शक्य होत नाही त्यातच ग्रामसेवक हे एखाद्या ग्रामपंचायत मध्ये नियुक्ती असताना त्या ग्रामपंचायती क्षेत्रातील रहिवाशांना आपला मोबाईल नंबर एक देतात तर दुसऱ्या ग्रामपंचायतीतील नागरिकांना दुसरा मोबाईल नंबर देतात प्रत्यक्षात मात्र दोन्ही नंबर बंद करून आपला कार्यभार हाकण्याचे काम ग्रामसेवक करीत असल्याने ग्रामपंचायत पातळीवरील नागरिकांची कामे महिने न महिने रखडत असल्याचे चित्र महाड तालुक्यातील ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे 

एकेका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्याने अनेक ग्रामसेवक एकेका ग्रामपंचायत मध्ये आठ ते दहा दिवस फेरफटका देखील मारत नाहीत अनेक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार असल्याचा गैर फायदा घेऊन अनेक ग्रामसेवक कामावर गैर हजर राहातात. परिणामी नागरिकांची कामे ठप्प झाली आहेत याबाबत नागरिकांनी अनेक तक्रार वरिष्ठां कडे करून देखील कोणताही उपाय यावर केला जात नाही

 ज्या लोकप्रतिनिधींना ज्या नागरिकांनी निवडून दिले ते लोकप्रतिनिधी देखील नागरिकांना वाऱ्यावर सोडत असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न महाड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे तालुक्यातील जनतेच्या तक्रार अर्जाला पंचायत समितीमध्ये केराची टोपली दाखविली जात असल्याने तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत जिल्हा परिषद,पंचायत समित्या महसुल विभागा प्रमाणे शासनाच्या प्रत्येक विभागांतुन शेकडो पदे रिक्त आहेंत.अश्या रिक्त पदांचा सरकारी कामावर विपरीत परिणाम होत असताना लोक प्रतिनिधी मात्र सत्ता मिळविण्याच्या नादांत आहेंत.

 प्रशासनाकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यां मध्ये सर्व सामान्यांच्या कामा बाबत उदासिनता आहें. महाड तालुक्यामध्ये असलेल्या ग्रामसेवकांची पदे त्वरीत भरण्यांत यावींत अशी मागणी ग्रामिण भागांतुन होत असताना मात्र नागरिकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करीत आहेत
तालुक्यातील ग्रामसेवकांवर अंकुश ठेवण्याचे काम गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असते मात्र महाड तालुक्यात मागील तीन वर्षापासून कायमस्वरूपी गट विकास अधिकारी नसल्याने प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या हाती महाड पंचायत समितीची दोरी असल्याने संबंधित प्रभारी गटविकास अधिकाऱ्याला देखील कोणतेही गांभीर्य पडलेले नसल्याने त्याचाच फायदा ग्रामसेवक घेत असून तालुक्यातील 134 ग्रामपंचायत पैकी 95 टक्के ग्रामपंचायती भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत रोज कुठल्या ना कुठल्या ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत महाड पंचायत समितीमध्ये तक्रार दाखल होत आहे मात्र त्या तक्रारीची ना लोकप्रतिनिधी दखल घेत ना प्रशासकीय अधिकारी त्यामुळे ग्रामसेवकांना मोकळे रान मिळाले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा