Breaking

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

जेऊर येथे होणार ‘आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहचतील घरोघरी’



जेऊर येथे होणार ‘आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहचतील घरोघरी’


कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे ) 

 आमदार संजयमामा शिंदे यांच्या पुढाकाराने करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी  ‘आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहचतील घरोघरी’ हा उपक्रम होणार आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट गावातच लाभ मिळावा  म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम होणार आहे. याचा लाभ जेऊरसह दहिगाव, शेलगाव, लव्हे, निंभोरे, शेटफळ, जेऊरवाडी येथील नागरिकांनी, असे आवाहन करण्यात आले आहे.
        या उपक्रमात नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एसटी बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई- श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगण्यात येणार आहेत.
   याबरोबर पात्र व गरजु नागरिकांचे अर्ज कार्यक्रमस्थळी स्वीकारण्यात येवून त्यांची विविध योजनांसाठी निकषाप्रमाणे निवड करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जेऊर येथील स्वामी विवेकानंद पतसंसंस्थेचा हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा