Breaking

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

शेतकरी संघटना एकवटल्याने त्यांच्या घामाचा दाम मिळणार.



शेतकरी संघटना एकवटल्याने त्यांच्या घामाचा दाम मिळणार.




टेंभूर्णी(प्रतिनीधी)-सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्रित येत पंढरपूर येथे २३ आॅक्टोंबरला ऊस परिषदेचे आयोजन केले आहे.ऊस परिषदेच्या पुर्व तयारीसाठी टेंभूर्णी येथे पुष्पक मंगल कार्यालयात माढा तालुक्यातील सर्व शेतकरी नेत्यांची बैठक झाली.या बैठकीमध्ये शेतकरी नेत्यांचे स्वागत व प्रास्ताविक रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील यांनी केले.प्रास्ताविकात प्रा सुहास पाटील म्हणाले, शेतकर्‍यांच्या ऊसाला दर मिळवून देण्यासाठी सर्व शेतकरी संघटना एकत्रित येत आहोत.जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस गाळपात प्रथम क्रमांक मिळवला म्हणून पाठ थोपटवूण घेण्यापेक्षा जास्तीत जास्त दर शेतकर्‍यांना देऊन शेतकरी त्यांचा सन्मान करतील. ऊस शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक व फसवणुक चालु आहे.ती रोखण्यासाठी आंम्ही सर्वजण शेतकरी चळवळी एकत्रित झालो आहोत.


त्याचा फायदा निश्चीतच ऊस ऊत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे.यावेळी माऊली हळणकर म्हणाले,सर्व कारखानदार रिकव्हरी कशी कमी दाखवतात.वजन काट्यामधील तफावत व तोडणी प्रोग्रामध्ये शेतकर्‍यांवर होत असलेला अन्याय या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ऊस परिषद घेत आहोत.त्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी ऊस परिषदेसाठी ऊपस्थित रहावे.शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी बैठकीला ऊपस्थिती दाखवत मार्गदर्शन केले.संजय कोकाटे म्हणाले,साखर कारखानदार वजन काटामारी करीत,ऊसाचा रस डायरेक्ट मोलॅसीस डिस्टीलरीकडे घेतला जातो,त्यामुळे रिकव्हरीला फटका बसतो.त्यासाठी साखर ऊद्योग हा नियंत्रण मुक्त करावा.म्हणजे कारखानदारांची स्पर्धा तयार झाल्याशिवाय ऊस शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही.अन्यथा साखर ऊद्योगावर पुर्णपणे नियंत्रण असावे,म्हणजे शेतकर्‍यांची पिळवणूक थांबेल.व ऊसाला चांगला दर मिळेल.राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले म्हणाले,आजपर्यंत शेतकरी चळवळीतील नेत्यांनी ऊस ऊत्पादक शेतकर्‍यांना ऊस मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.तरीही त्यांना टिका टिप्पणीला सामोरे जावे लागले.याचे मुख्य कारण कारखानदारांनीच शेतकरी नेत्यांची बदनामी केली.शेतकरी नेत्यांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी संघटना विखुरल्यामुळे चळवळीची शक्ती कमी दिसु लागल्याने कारखान्यांनी मनमानील तसा दर देण्यास सुरूवात केली.म्हणूनच आंम्ही सर्वजण एकत्रित येत ऊस दर मिळवून देण्यासाठी उस परिषद पंढरपूर येथे घेत आहोत.शेतकरी नेते समाधान फाटे म्हणाले, मागील गळीत हंगामातील अनेक कारखान्यांनी शेतकर्‍यांची बिले दिलेली नाहीत.तसेच चालु गळीत हंगामात २०२२-२३ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्याने दर ठरवूनच ऊसतोड करावी,अन्यथा ऊग्र अंदोलन करण्यात येतील.या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ऊस परिषदेचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी ऊस परिषदेचे यावे ही विनंती करीत आहोत. या बैठकीसाठी शिवसेना शिंदेगटाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे,ऊस दर संघर्ष समितीचे सदस्स,भाजपा किसान सेलचे अध्यक्ष माऊली हळणकर,रयत क्रांती संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष दिपक भोसले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जनक्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे,बळीराजा संघटनेचे प्रदेश ऊपाध्यक्ष माऊली जवळगेकर,वंचित आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ घार्गे-देशमुख,रयत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील,बळीराजा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डोके,माढा तालुकाध्यक्ष पंडित पाटील,रयत क्रांतीचे जिल्हा समन्वयक विठ्ठल मस्के, रयत क्रांतीचे जिल्हा सरचिटणीस  राजकुमार सरडे,जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड,रयत क्रांतीचे जिल्हा कार्याध्यक्ष आण्णा गवळी,स्वाभिमानी युवा आघाडी माढा तालुकाध्यक्ष दिनेश गाडेकर,रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष नागेश गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन आटकळे, प्रहार संघटनेचे राजेंद्र शिंदे,रयतचे राहुल बिडवे,दत्तात्रय गायकवाड,बापू मेजर गायकवाड,रामदास खराडे,विनायक केचे,भारत गायकवाड,पंडित पाटील,गणेश परबत,तुकाराम गवळी,बापू दगडे,वैभव डरंगे,भारत गायकवाड आदी पदाधिकारी ऊपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा