सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अगोदर चालू वर्षाचे उसाचे दर जाहीर करावे नंतरच कारखाने चालू करावे,,,,, जनशक्ती शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष अतुल राऊत
करमाळा प्रतिनिधी /अलीम शेख
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रथमतः चालू वर्षाचे उसाचे दर जाहीर करावे नंतरच साखर कारखाने चालू करावे अन्यथा जिल्ह्यातील साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल राऊत यांनी दिला आहे ते बोलताना पुढे म्हणाले की 15 ऑक्टोबरला साखर कारखाने चालू करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्री समितीने परवानगी दिली आहे कारखाने कारखाने गाळप सुरू करण्यास सज्ज होत आहेत परंतु चालू गळीत हंगामाच्या उसाच्या दराची कोंडी अजून कोणी फोडली नाहीत तसेच काही कारखान्याची गत हंगामातील एफआरपी अजून देणे बाकी आहे असे राऊत बोलताना म्हणाले नवीन चालू हंगाम सुरू होणार आहे तरी मागील देणी दिलेली नाहीत व जनशक्ती शेतकरी संघटना कारखाने चालू करून देणार नाही शेतकरी बिलाच्या प्रतीक्षेत आहेत तरी ज्यांनी देणे अद्याप बाकी आहे त्या कारखान्याने मागील देणी द्यावीत व चालू वर्षाची ऊसाची दर जाहीर करुन कारखाने चालू कराव्यात अन्यथा समस्त शेतकरी बांधव व जनशक्ती शेतकरी संघटना कारखाने चालू करून देणार नाही असे जिल्हा उपाध्यक्ष अतुल शेठ राउत यांनी आवाहन केले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा