Breaking

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

कन्हेरगांव येथील साखरे - गोडसे वस्तीपर्यंतचा जुना पंढरपूर रस्ता त्वरित करण्याची मागणी.


कन्हेरगांव येथील साखरे - गोडसे वस्तीपर्यंतचा जुना पंढरपूर रस्ता त्वरित करण्याची मागणी.


कन्हेरगांव दि प्रतिनिधी  धनंजय मोरे 

निमगाव टें - कन्हेरगांव रोडपासून ते देविदास साखरे ते गोडसे वस्ती पर्यंत दोन किमी अंतरावर असणारा जुना पंढरपूर रस्ता  रस्ता त्वरित मुरमीकरण , खडीकरण करण्यात यावा , अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे ग्रामस्थांनी भेट घेऊन मागणी केली आहे .
       यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब फोन करून रस्ता करण्यासाठी सुचना केल्या. कन्हेरगांव निमगाव टें रोड पासून तांबवे पाटीकडे जाणारा देविदास साखरे, गोडसे वस्ती पर्यंत दोन किलोमीटर चा रस्ता हा अत्यंत खराब असून , या रस्त्यावरून चालत जाणे सुद्धा या भागातील ग्रामस्थांना मुश्किल झाले आहे. सध्या दररोज पाऊस पडत असल्याने या रस्त्यावर चिखलच चिखल झाला असून , येथील नागरिकांना घराबाहेरही पडणे अवघड झाले आहे . 15 ऑक्टोबर पासून सर्व साखर कारखाने सुरू झाले असून , या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कन्हेरगांव येथील ग्रामस्थांचा ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने आपल्या शेतातील ऊस साखर कारखान्याला कसा घालवायचा या चिंतेत या रस्त्यावरील शेतकरी वर्ग पडला आहे . हा रस्ता त्वरित मुरमीकरण किंवा खडीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे केली आहे .
      यावेळी  कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे  ,  विजय मोरे , औदुंबर शिंदे , दत्तात्रय मोरे , गणेश मोरे , नागेश माने , देविदास साखरे , नागनाथ खोचरे , धनाजी खोचरे , सुशांत केदार , सुभाष केदार , गोविंद केदार,  विनोद खोचरे , नागनाथ माळी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा