*नंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते वैभव पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव चे सुपुत्र एक दिलदार व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कीर्तन ह.भ.प.युवा किर्तनकार कांचन ताई शेळके याच किर्तन सेवा सोहळा सर्वरोग निदान शिबिर रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण लहान मुलांना खाऊ वाटप अशा विविध उपक्रमांनी नंदगाव ग्रामस्थ व वैभव पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे पंचायत समिती सभापती सौ रेणुका ताई इंगोले पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर कोरे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गुड्डे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जग्जितसिंह पाटील यांचे वतीने तेरणा चारीटेबल ट्रस्ट व प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट यांच्यावतीने विविध रोग निदान शिबीर आयोजित केला होता.यामध्ये चारशेहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला तसेच रक्तदान शिबिर मध्ये 30 पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला या कार्यक्रमासाठी गावातील सर्व युवक वर्ग अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा