“ उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई आठ जणांवर गुन्हे दाखल .”
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 21 मे रोजी जिल्हाभरात छापे मारुन छाप्यातील अवैध मद्य जप्त करुन 8 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 8 गुन्हे नोंदवले आहेत.
1) वाशी पोलीसांना शिवशक्ती नगर, वाशी येथे ताई पवार या 19 लि. हातभट्टी दारु, संगीता शिंदे या वाशी यैथील एका पेट्रोलियम विक्री केंद्राजवळ गावठी दातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 450 लि. द्रव पदार्थ व 20 लि. हातभट्टी दारु तर महोदव पवार हे घुमटाचा फड, वाशी येथे 18 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.
2) परंडा पोलीसांना अरबाज शेख हे परंडा येथील बार्शी- कुर्डूवाडी रस्त्याकडेला 10 लि. हातभट्टी दारु व 10 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.
3) येरमाळा पोलीसांना ताईबाई काळे या तेरखेडा- कडकनाथवाडी रस्त्यावरील एका हॉटेलसमोर 24 बाटल्या देशी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
4) स्था.गु.शा. च्या पथकाने समुद्रवाणी येथे दोन ठिकाणी छापा टाकला असता श्रीनाथ कूकडे व महादेव आडसूळे हे दोघे देशी- विदेशी दारु अनुक्रमे 77,820 ₹ व 18,170 ₹ असा एकूण 95,990 ₹ चा माल बाळगलेले आढळले.
5) उस्मानाबाद (श.) पोलीसांना दत्ता चव्हाण हे पारधी पिढी, उस्मानाबाद येथील एका ओढ्याजवळ गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 1,140 लि. द्रव पदार्थ प्लास्टीकच्या 3 पिंपांत व 36 पत्रा डब्यांत बाळगलेले आढळले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा