*अखिलेश कोरे ची "बाॅश" इंटरनॅशनल कंपनीत उच्च गुणवत्तेवर निवड*
कुर्डुवाडी (विशेष प्रतिनिधी) येथील वृत्तपत्र विक्रेता अखिलेश अरुण कोरे हा नूकताच उच्च श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअर झाला होता.तो जाॅबच्या शोधात होताच.त्याच्या उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर त्याची "बाॅश"या इंटरनॅशनल कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे.त्याबध्दल त्यांचे सर्वंत्र कौतुक केले जात आहे.
अखिलेशचे वडील बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांनीही आपल्या संपूर्ण आयुष्यात वर्तमान पत्रांचा व्यवसाय सचोटीने व प्रामाणिकपणे केला.ते हा व्यवसाय करीत असताना वडीलांची छोटी मोठी कामे करताना अखिलेश यालाही वृत्तपत्र वाटपाचे वेड लागले. वडील म्हणायचे माझे नशीबी आलंय तू चांगला शिकून मोठा हो.
अखिलेशने वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत उच्च शिक्षण घेण्याची मनोमन जिद्द बाळगली होती.पण ती त्याने वडिलांना बोलून दाखवली नव्हती.
मध्यंतरी झाडाची मोठी फांदी वडीलांच्या छातीवर पडल्याने वडीलांचे सायकलवरुन वृत्तपत्र वाटप बंद झाले होते.अन् नेमका याच संधीचा फायदा घेऊन अखिलेशने शालेय शिक्षण घेत असतानाच वृत्तपत्र वाटपास सुरुवात केली.
नूतन विद्यालयातील शालेय शिक्षणानंतर आय.टी.आय.मध्ये उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाला.त्याच्या मार्क्सवर बार्शीच्या एस.एस.पी.एम.पाॅलिटेक्निक (जगदाळे मामाच्या) महाविद्यालयात डिप्लोमाला प्रवेश मिळाला.भल्या पहाटे उठून वृत्तपत्र वाटून त्याने डिप्लोमाही उच्च श्रेणीत पूर्ण केला.
त्याला डिप्लोमावर नोकरीही मिळाली होती पण त्याचे ध्येय काही वेगळेच होते.डिप्लोमाच्या मार्कवर त्याने थेट बी.ई.ला अर्ज केला अन् उच्च गुणवत्तेवर पहिल्या लाटेतच त्याचे बार्शीच्याच माईर्सच्या एम.आय.टी.काॅलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग ऍड रिसर्च काॅलेजला निवड झाली.अन् त्याचा आनंद गगनात मावेना.इंजिनिअर व्हायची त्यानं जिद्दच बाळगली होती.
ऊन,वारा, पाऊस यांची तमा न बाळगता भल्या पहाटे उठून कुर्डुवाडी व परिसरात वृत्तपत्र वाटून सकाळी आठच्या आत तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.वृत्तपत्रे उशिरा आली की त्याची फार कसरत होत होती.कधी जेवण वेळेवर नसे तर वसूली लांबली की कधी पैशाची चणचण.अनंत अडचणींवर मात करून तीन वर्षे अप ऍड डाऊन करत अखेर २०२१ ला इंजिनिअरिंगचे शिक्षण उच्च श्रेणीत पूर्ण केले. महाविद्यालयाच्या अखेरच्या पेपर पर्यंत वृत्तपत्र वाटूनच परिक्षा दिल्या.
विशेष सांगावयाचे म्हणजे म्हणजे ही सगळी शिक्षण व व्यवसायाची कसरती करत असताना कुर्डुवाडीच्या रेल्वे वर्कशॉप्स मध्ये पाच वर्षांत तीन वेळा तीन वेळा विशेष प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.
उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला लहान मोठ्या नोक-या आल्या पण त्यांचे ध्येय काही वेगळेच होते.मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर कोरोनो मुळे नोकरीत आलेला विस्कळीतपणा हेरुन त्याच्या शिक्षणाशी निगडीत आय.टी.कनेक्टेड हैदराबाद येथील सहा महिने ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या अखिलेश अरुण कोरे याची "बाॅश" या इंटरनॅशनल कंपनीत उच्च गुणवत्तेवर निवड झाले बद्दल त्यांचे सर्वंत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
अखिलेशच्या यशाचे श्रेय तो त्याचे आदर्शवत जेष्ठ पत्रकार अरुण कोरे व त्याचे शिक्षण घेत असताना त्यांच्या रस्त्याकडे डोळे लावून बसलेल्या आई सौ.छाया कोरे,व नुकतीच विवाहबद्ध झालेली बहिण सौ.अनिहा शेटे(कोरे) तसेच शालैय, डिप्लोमा,महाविद्यालयांतील प्राध्यापक यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यांनाच हे श्रेय असल्याचे तो विनम्रतेने आमच्या प्रतिनिधीस व्यक्त करतोय
आज काम करण्यापासून अलिप्त रहाणा-या तरुणाईला अखिलेश कोरे चा परिश्रम पूरक केलेला प्रवास व शिक्षण हे आदर्श असून त्याचा धडा तरुणाईने घेण्यासारखा आहे.
विशेष सांगावयाचे म्हणजे कोरे परिवार मंगळवेढा तालुक्यातील पाठखळचे असून व्यवसाय व नोकरी निमित्ताने कुर्डुवाडीस स्थानिक झाले असून वडीलोपार्तीत जमीन जुमला पाठखळला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा