Breaking

बुधवार, २५ मे, २०२२

१७ मे अखेर अनुदानासह प्रति टन 2300प्रमाणे ऊस बिल व हंगाम अखेर ऊस तोडणी वाहतूक बील ‌अदा- आ.बबनराव शिंदे


१७ मे अखेर अनुदानासह प्रति टन 2300प्रमाणे ऊस बिल व हंगाम अखेर ऊस तोडणी वाहतूक बील ‌अदा- आ.बबनराव शिंदे


बेंबळे।प्रतिनिधी...                   फोटो
 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर  येथील सन 2021-22 गळीत हंगामाची सांगता झालेली असून हंगामअखेर गाळप झालेल्या ऊसाचे प्रतिटन 2100/- व प्रति मे.टन रू.200/- अनुदान याप्रमाणे प्रतिटन रू.2300/-प्रमाणे पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले आहे त्याचबरोबर  हंगाम  अखेर पर्यंतचे संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बीले उद्या दि.25 मे रोजी अदा करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनदादा शिंदे  यांनी दिली.

 

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं.1 ची सांगता झालेली असून  युनिट नं.1 कडे 24 लाख 78 हजार  मे.टन तर युनिट नं. 2 कडे 6 लाख 55 हजार  मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या हंगामात दोन्ही युनिटकडे जाहीर केलेल्या प्रतिटन  अनुदान याप्रमाणे प्पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले आहे. तसेच युनिट नं. 1 कडे  ऊस तोडणी वाहूतक करणा-या कंत्राटदारांचे 30 एप्रिल अखेर संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बीले अदा करण्यात आलेली आहेत 10 दिवसाला पेमेंट करणारा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना राज्यातील पहिला साखर कारखाना आहे तसेच हंगाम अखेर पर्यंतचे ऊस तोडणी वाहतूक बीले दि.25 मे रोजी जमा करणार असल्याची  माहीती आ.शिंदे यांनी दिली.सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा