*टेंभुर्णी येथे भर दिवसा तिघांवर प्राणघातक हल्ला -काँग्रेसच्या अध्यक्ष सह तिघांना अटक :तीन जण आरोपी फरार*
टेंभुर्णी प्रतिनिधी:-
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे भावकीतील तिघांवर सहा जणांनी प्राण घातक हल्ला करून हॉस्पिटल मधील साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ कदम व त्यांच्या दोन साथीदारांना टेंभुर्णी पोलीसांनी ताब्यात घेतले अन्य तिघे जण फरार झाले आहेत.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेले माहिती अशी की यशवंत सुरेश कदम हे फिर्यादी बाळासाहेब दादासाहेब कदम यांच्या घरासमोरून चालले असताना. फिर्यादीने माझ्याकडे येणाऱ्या कामगारांना कामास येण्यास का अडथळा करता असे विचारले असता. यशवंत कदम यांनी फिर्यादीस तू इथेच थांब तुला दाखवतो असे म्हणत. सकाळी सव्वा आठ वाजायचे दरम्यान फिर्यादीच्या भावकीतील सोमनाथ जयसिंग कदम, धनाजी तानाजी शिंदे, किसन विठ्ठल देशमुख यशवंत सुरेश कदम हे सर्व रा. (झिरपे वस्ती) टेंभुर्णी यांच्या सोबत फिर्यादीच्या घरासमोर येऊन सोमनाथ जयसिंग कदम यांनी तुम्ही आम्हाला नेहमीच विरोध करता आज तुम्हाला जिवंत सोडत नाही असे म्हणत लोखंडी रॉडने फिर्यादीचे वडील दादासाहेब कदम यांच्या डोक्यात जोरात मारले. यशवंत कदम यांनी त्याच्या हातात असलेल्या लोखंडी पाईपने फिर्यादी बाळासाहेब कदम यांच्या हाताला मारहाण केले. त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचे भाऊ उत्तम कदम हे भांडण सोडण्यासाठी आले असताना त्यांनाही धनाजी तानाजी शिंदे, किसन विठ्ठल देशमुख या दोघांनी दगडाने मारहाण केली. या मारहाणी मध्ये फिर्यादीचे वडील दादासाहेब कदम हे चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना मारणे बंद केले. त्यानंतर फिर्यादीने व त्याचा पुतण्या प्रज्वल कदम यांनी दादासाहेब कदम यांना टेंभुर्णी येथील एका हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असता. वरील चार आरोपी व त्यांच्यासोबतच्या दोन अनोळखी लोकांनी पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये येऊन फिर्यादीचे वडील व भाऊ यांना मारहाण केली. यावेळी फिर्यादीचे भाऊ उत्तम कदम यांच्या डोक्यात मार लागला असून यावेळी हॉस्पिटल मधील कर्मचारी राजाराम सुतार व शितलराज साळुंखे हे भांडण सोडण्यासाठी गेले असता. त्यांनाही वरील लोकांनी मारहाण केली. तसेच यावेळी हॉस्पिटल मधील मॉनिटर, फॅन, इलेक्ट्रिसिटी बोर्ड इत्यादी सामानाची तोडफोड करून सुमारे २ लाख रुपयाचे नुकसान केले. अशा आशयाची फिर्यादी बाळासाहेब दादासाहेब कदम यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये दिली यांच्यावर भादवि कलम ३०७,३२६,३२४,३२३,५०६,४२७,४५२,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे सहा जणांवर गुन्हे दाखल झाले असून त्यातील तिघाजणांना अटक केली असून दोन अनोळखी सह तिघे जण फरार झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच करमाळा विभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा