Breaking

सोमवार, ३० मे, २०२२

टेंभुर्णी येथील जनता विद्यालयाच्या १९७६ च्या दहावीच्या बॅचचा गेट-टुगेदर कार्यक्रम संपन्न*



*टेंभुर्णी  येथील जनता विद्यालयाच्या १९७६ च्या दहावीच्या बॅचचा गेट-टुगेदर कार्यक्रम संपन्न*

टेंभुर्णी (प्रतिनिधी )-येथील जनता विद्यालयाच्या सन १९७६ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा गेट-टुगेदर कार्यक्रम जगदंबा प्युअर व्हेज येथे संपन्न झाला.
 दहावीच्या १९७६ बॅचचे हे सर्व वर्गमित्र तब्बल ४६ वर्षांनी एकमेकांना भेटत होते. शनिवार संपूर्ण दिवस सर्व वर्ग मित्र-मैत्रिणींनी एकत्र घालवला. सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ३० ते ३५ जण कुटुंबीयांसह सहभागी झाले होते .यातील कित्येक जण ७६ नंतर प्रथमच एकमेकांना भेटत होते. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर भेटत असले तरी सर्वांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सर्वजण ४६ वर्षांपूर्वीचे वर्गातील दिवस आठवून एकमेकांना दाद देत होते. परिचय करून घेत होते. सर्वजण पुन्हा एकदा विद्यार्थी झाले होते.
 पुणे येथे उद्योजक असलेले दत्तात्रय कुटे,  शोभा भंडारे, अरुण देशमुख, नरहरी अरगडे, प्रकाश ढगे, इस्माईल कोरबू यांनी पुढाकार घेऊन तेव्हाच्या वर्ग मित्रांचे पत्ते व मोबाईल नंबर मिळवून सर्वांना एकत्र आणले.
 या कार्यक्रमास १९७६च्या दहावीच्या वर्गास शिकवणारे शिक्षक बी. एम. कोकरे ,एम.बी. वागज, बी.बी. कुनाळे, जी.व्ही. उबाळे ,टी.एल. गायकवाड,ए.एम. सय्यद, डि.एस.गायकवाड ,मुख्याध्यापक पी. डी. भोसले तसेच माझी केंद्रप्रमुख मीनाक्षी उबाळे, माजी मुख्याध्यापक द.नी. भोसले, ज्ञानेश्वर साखरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमामध्ये १९७६ च्या बॅच मधील सर्वांनी आपली ओळख करून देत दहावी नंतर आपण कसे घडलो. कोणत्या पदावर काम केले. सेवानिवृत्ती नंतरचे जीवन. पत्नी-मुले काय करतात असे सांगून परिचय करून दिला. या गेट-टुगेदर कार्यक्रमात शिक्षक टी.एल.गायकवाड, एम. बी. वागज,ए.एम. सय्यद यांच्यासह दत्तात्रय कुटे, अरुण देशमुख, नागनाथ माळी, नरहरी आरगडे, इस्माईल कोरबु, प्रकाश ढगे, चंद्रकांत जाधव, जयश्री कुलकर्णी, शोभा भंडारे, शालन कुटे, नवनाथ पवार, हिरालाल घोडके, नंदकुमार साखरे यांनी मनोगत व्यक्त केले.
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजली अरगडे, वंदना कुटे, सुरय्या कोरबु ,शोभा देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा