वेळू वि.का. सोसायटी निवडणूक ताक्तीनिशी लढवणार-वैभव चोर (साळुंके)
श्रीगोंदा-नितीन रोही
श्रीगोंदा तालुक्यातील वेळूमधील वि का सोसायटी ची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असून या ठिकाणची युवा पिढी या निवडणुकीत उतरून निवडणुकीचे सूत्र हाती घेऊन निवडणूक करणार आहेत. वेळू तील शेतकरी कुटुंबातील नवे पर्व वैभव अरुण चोर(साळुंके)हे वेळू विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी च्या निवडणुकीत उतरणार असल्याची खात्रीशी माहिती मिळाली आहे. ते खुप मताने निवडून येऊन संचालक पदी विराजमान होणार आहेत असे चोर यांनी सांगितले. त्यांची शेतकरी वर्गाची तळमळ, सर्वांशी हस्तमुख राहाणे, हा स्वभाव असल्याने मतदार त्यांची आवर्जून वाट पहात आहेत.
त्यामुळे ही निवडणूक तालुक्याच्या दृष्टीने अतिशय चुरशीची होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा