सौ. नूतनताई पानसरे यांची शिवसेनेच्या श्रीगोंदा महिला प्रमुख पदी निवड.
आज दिनांक २६ मे २०२२ रोजी नूतन ताई पानसरे यांची श्रीगोंदा तालुक्याच्या महिला प्रमुख पदी निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र शिवसेना नेते व खासदार गजाननजी कीर्तिकर साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर कार्यक्रमात शिवसेना उपनेते संजय घाडी, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, महिला आघाडी संपर्कप्रमुख मते ताई, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई निंबाळकर, नगर शहर प्रमुख संभाजी राजे कदम, महापौर नगर शहर रोहिणी ताई शेंडगे, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे उपस्थित होते. निवडीबद्दल शिवसेना तालुका संघटक सुरेश देशमुख, शिवसेना उपतालुका प्रमुख निलेश साळुंखे, युवा सेना तालुका प्रमुख निलेश गोरे, शहरप्रमुख संतोष खेतमाळीस, श्रीराम मस्के राजु कोरडे, सुनील शिंदे, नितीन शिंदे, अजय सावंत, शिवाजी राऊत, नितीन गायकवाड, सागर खेडकर यांनी अभिनंदन केले.
श्रीगोंदा तालुक्यातील जुनी महिला आघाडी बरखास्त करून नवी कार्यक्षम अशी महिला आघाडी उभी करण्यात आली. सदर पदाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार नूतन ताई पानसरे यांनी केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा