Breaking

गुरुवार, २६ मे, २०२२

पिलीव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांच्या विविध पदावर निवडी


पिलीव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांच्या विविध पदावर निवडी         



 पिलीव प्रतिनिधी -
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांच्या पिलीव शहरच्या विविध पदावर नियुक्त्या करून त्यांना निवडीचे पत्र माजी क्रुषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल मदने यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. यामध्ये राजेंद्र करांडे यांची भारतीय जनता पक्षाच्या पिलीव शहराध्यक्ष पदी ,ग्रामपंचायत सदस्या सुषमाताई जामदार यांची महीला मोर्चा पिलीव शहराध्यक्ष पदी,नवनाथ पिसे यांची ओबीसी मोर्चा अध्यक्ष पदी,प्रमोद पाटील यांची किसान मोर्चा अध्यक्ष पदी तर महेश बोडरे यांची युवा मोर्चा अध्यक्ष पदी निवडी करण्यात आल्या.या सर्वांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडीप्रसंगी उपसरपंच संजय आर्वे, जयसिह जहागीरदार, पांडुसिंग जनवर,नितीन गबाले,माजी सरपंच उमेश बोडरे, अविनाश जेऊरकर, प्रकाश जाधव,अरुणसिंह जामदार, नानासाहेब मदने, भैया जामदार, मोहसीन शेख,तानाजी लोखंडे, सचिन मदने,अंकुश भैस,आबासाहेब बनसोडे, पत्रकार प्रमोद भैस,सुजित सातपुते,समशेरसिंग भैस यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    फोटो -पिलीव शहराच्या नुतन निवडीप्रसंगी माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार, राहुल मदने, उपसरपंच संजय आर्वे व नुतन पदाधिकारी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा