*करमाळा येथे तीन दिवसाचे मोफत फिटनेस शिबीर...महेश वैद्य
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विक्रमवीर महेश वैद्य करमाळा येथे हॅपी माईंड हॅपी हेल्थचे धडे देणार आहे
या उपक्रमास यशकल्याणी संस्थेचे प्रा. गणेश भाऊ करे पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे , डॉ. बाबूराव हिरडे किसन कांबळे तालुकाध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना हे उपस्थीत राहणार आहेत.
करमाळा येथील रहिवासी.असलेले परंतु सध्या मुंबई येथे फिटनेस अकॅडमी चालवणारे विक्रमवीर महेश वैद्य करमाळा येथील किल्ला वेशीमधील नगरपालिकेच्या जयवंतराव जगताप सभागृहात दिनांक २७ मे पासून २९ मे पर्यंत हॅपी माईंड हॅपी हेल्थचे धडे देणार असल्याची माहिती महेश वैद्य यांनी दिली आहे. यामध्ये सकाळी ६ ते ९या वेळेत पुरुषांसाठीआणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महिलांसाठी शिबीर संपन्न होणार आहे. करमाळा ही माझी मायभूमी आहे या मातीशी व इथल्या माणसांशी माझे प्रेमाचे नाते जोडलेले आहे याची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे. मागील पंचवीस वर्षे मुंबई येथे फिटनेस अक्याडमी अविरत चालू आहे, सिने विश्वातील व उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती आज या फिटनेस अक्याडमी मध्ये आनंदी जीवनासाठी व आरोग्यासाठी कार्यरत आहेत.
कोरोना महामारीने सर्व जगभर थैमान घातले आहे माणूस पूरता हादरून गेला आहे त्यामुळे लोकांना आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज वाटत आहे. रोज आरोग्यासाठी पंचेचाळीस मिनिटे देणे ही गरज निर्माण झाली आहे.माणसाची रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी या कल्पनेचा निश्चितच फायदा होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा. व्यायाम हा प्रकार सर्वांना माहीत आहे तो कसा करावा किती करावा याची सांगड घालणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य व्यायाम व समतोल आहार गरजेचा आहे. यामध्ये दहा वर्षे ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांमुलींचा शारीरिक व बौद्धिक विकास होत असल्याने या वयामध्ये योग्य व्यायाम आणि चांगले विचारांची गरज निर्माण झाली आहे. मुलांची शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी रोज पाऊनतास शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. तसेच चाळीशी ओलांडलेल्या महिला पुरुषांसाठी अनेक आजार होऊ लागले आहेत त्यामध्ये मधूमेह उच्च रक्तदाब हाडांची झीज होऊन अशक्तपणा येत असल्याने या व्याधींवर मात करण्यासाठी शरीर मजबूत ठेवून आनंदी मन असणे गरजेचे आहे.
यासाठी करमाळा येथील किसन कांबळे सर, विनोदकुमार गांधी, भाऊसाहेब फुलारी, संजयकुमार राजेघोरपडे सर, संध्याताई ढोके, निलेश कुलकर्णि, राजेंद्र जगताप, नाना रामनवमीवाले, चंद्रशेखर रामनवमीवाले यांनी सहकार्य करत आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा