सोलापूर जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाची सांगता... जिल्ह्यात एकूण 2 कोटी 29 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप तर 2 कोटी 16 लाख क्विंटल साखरेचे उत्पादनःःःः
... ऊस गाळपात माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना ( यूनिट 1) देशात प्रथम क्रमांकावर ......
...रिकव्हरी मध्ये श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर ......
बेंबळे।मुकुंद रामदासी। संग्रहित फोटो लावणे
सोलापूर जिल्ह्यातील सन 2021-2022 चा ऊस गळीत हंगाम आता संपलेला असून या गळीत हंगामात सहकारी 12 व खाजगी 21 अशा एकुण 33 साखर कारखान्या मधून 2 कोटी 29 लाख 55हजार 094 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून 2 कोटी 16 लाख 17 हजार 090 क्विंटल साखरेचे जिल्ह्यात उत्पादन करण्यात आले आहे, या हंगामात जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा(रिकव्हरी ) 9.42% असा आहे. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट 1 मध्ये चालू गळीत हंगामात 24 लाख 78 हजार 922 मेट्रिक टन उसाचे गाळप करून जिल्ह्यात, राज्यात व देशात या कारखान्याने ऊस गाळपात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे व हा एक ऊस गाळपातील ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जिल्ह्यामध्ये श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची (रिकव्हरी) साखर उतारा 11.34 टक्के असून हा कारखाना साखर उताऱ्यात( रिकव्हरी मध्ये) जिल्ह्यात प्रथम स्थानावर आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यात झालेले ऊस गाळप व साखर उत्पादन खालील प्रमाणे....
1) सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना अकलूज.. गाळप 13 24 229 मेट्रिक टन ...साखर 12 92 601 क्विंटल, 2) सदाशिवनगर साखर कारखाना... गाळप 34 64 55 मेट्रिक टन, साखर 333500 क्विंटल, 3) सिद्धेश्वर सहकारी ,कुमठे गाळप 13 24 600 मेट्रिक टन, साखर 13 13 845 क्विंटल, 4) भीमा सहकारी टाकळी- सिकंदर मोहोळ गाळप 4815 24 मेट्रिक टन, साखर 45 15 00 क्विंटल 5)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा