टेंभुर्णी येथील हॉटेल चालकाचा प्रामाणिक पणा ! 21 तोळे सोने व 1 लाख रुपयांची बॅग ग्राहकास केली परत.
टेंभुर्णी (प्रतिनिधी) काल टेंभुर्णी येथे प्रामाणिकपणा चे अप्रतिम उदाहरण पाहावयास मिळाले या बाबत सविस्तर हकिगत अशी की, हॉटेल वैष्णवी येथे करमाळा येथील शिक्षक दाम्पत्य हे पंढरपूरला जात असताना ते नाष्टा करण्यासाठी थांबले होते त्यांनी आपल्या सोबत असलेली बॅग मध्ये 21 सोनं व 1 लाख रुपये असा ऐवज होता नेमकी तीच बॅग हॉटेल वैष्णवी येथे विसरले आणि ते पंढरपूरकडे रवाना झाले, त्याठिकाणी तो सर्व ऐवज मुली कडे देण्यासाठी बॅग शोधत राहिले ती मिळत नसल्याने ते दाम्पत्य खूप घाबरून गेले मग त्यानी आपला एक छोटा मोबाईल त्या बॅग मध्ये असल्याचे लक्षात आले, त्यावर कॉल केला असता तो कॉल हॉटेल वैष्णवी चे चालक गणेश खटके यांनी घेतला , तुमची बॅग माझ्याकडे आहे तुम्ही घाबरून जाऊ नका, ती सुरक्षित आहे तुम्ही सावकाश या असे सांगितले त्यानंतर ते दाम्पत्य आले त्यांचे आनंद आश्रू वाहू लागले, त्यांना अतिशय गहिवरून आले ते गणेश च्या पाया पडू लागले ,तो सर्व मुद्देमाल त्यांच्या कडे सुपूर्द केला असता त्यांनी गणेश कडे एक विनंती केली की आमच्या कडून बक्षीस स्वरूपात तुम्ही काही तरी घ्या परंतु त्यांनी नकार दिला
सदरील सत्कृत्य बद्दल हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने हॉटेल चालक गणेश खटके यांचा सत्कार करण्यात आला, तसेच ही घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याउपाध्यक्ष नागेश बापू खटके यांनी तालुक्याचे सभापती विक्रम दादा शिंदे यांना सांगितली असता तेही हॉटेल चालक गणेश खटके यांचा सत्कार करणे साठी उपस्थित राहिले व गणेश यांच्या प्रामाणिकपणा त्यांनी आवर्जून कौतुक केले तसेच या वेळी हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री विजय बापू खटके पाटील , ,राष्ट्रवादी का पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश बापू खटके , शेतकी अधिकारी विजय साहेब खटके , शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पाटलू भाऊ खटके, भजनदास नाना खटके ,सोसायटी चेअरमन अशोक खटके, पत्रकार संतोष वाघमारे, सचिन होदाडे, सचिन पवार,गणेश व्यवहारे हे उपस्थित होते
हॉटेल चालक गणेश खटके यांचे सदर प्रामाणिकपणा सर्वत्र कौतुक होत असून दिवसभरात अनेकांनी त्यांची आवर्जून भेट घेऊन त्यांचे कौतुक केले आहे. चौकट करा "हॉटेल चे मालक बंडू नाना ढवळे हे नेहमीच चांगले मार्गदर्शन करतात त्यांचा सानिध्यात राहून प्रामाणिकपणाचे महत्त्व जाणले आहे त्यामूळे सदरील सोने व पैसा याचा मोह झाला नाही चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहिल्या मुळेच मला या प्रामाणिक पणा ची प्रेरणा मिळाली" गणेश खटके हॉटेल चालक


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा