Breaking

शनिवार, २८ मे, २०२२

टेंभुर्णी येथील प्रा. रवींद्र कुनाळे यांना पी.एच. डी.पदवी प्राप्त



 टेंभुर्णी येथील प्रा. रवींद्र कुनाळे यांना पी.एच. डी.पदवी प्राप्त


       टेंभुर्णी : येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.रवींद्र भिकाजी कुनाळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच डी. पदवी नुकतीच प्राप्त झाली आहे. प्रा. कुनाळे यांनी "ए स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ प्राणायाम ऑन दि वर्क  इफिसिएन्सी अँड हेल्थ स्टेटस ऑफ दि शुगर फॅक्टरी वर्कर्स"या विषयावर संशोधन केले असून त्यांना औरंगाबाद येथील डॉ. एस. एम.कोटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रा. रवींद्र कुनाळे यांच्या पीएच.डी. निमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार बबनरावजी शिंदे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मा.रणजितसिंह शिंदे, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा.विक्रमसिंह शिंदे, प्राचार्य डॉ महेंद्र कदम,सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.एस.के.पवार बार्शीचे डॉ.एस.एम.लांडगे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा