Breaking

मंगळवार, ३१ मे, २०२२

तिन वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारी महीला आरोपी जेरबंद..


तिन वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारी महीला आरोपी जेरबंद..
श्रीगोंदा-नितीन रोही

सविस्तर असे की दि.23/05/2022 रोजी फिर्यादी मयुरी विनोद गायकवाड वय 23 वर्ष रा. ढोलेपाटील रोड, पुणे हीची तिन वर्षाची मुलगी दि. 23/05/2022 रोजी दुपारी 13.30 वा.ते.15.00 वा. चे दरम्यान कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लि. ढोलेपाटील रोड शाखा शेजारील सार्वजनिक रोड पुणे येथुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे संमतीशिवाय कायदेशिर रखवालीतून पळवून नेले आहे. त्यावरुन कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.रजि.नं.47/2022 भा.द.वि.क. 363 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना दि.30/05/2022 रोजी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे पोसई अमोल घोडके व त्यांचे पथक सदर गुन्ह्याचे तपास कामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे आले असता त्यांचेकडील असलेले सीसीटीव्ही फुटेज चे माहीतीचे आधारे सदरचा गुन्ह्यातील आरोपी महीला ही शेंडगेवाडी शिवारातील असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहीती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली सदर माहीतीचे अनुशंगाने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित महीला नामे उषा नामदेव चव्हाण वय 35 वर्षे रा.शेंडगेवाडी ता. श्रीगोंदा हीस ताब्यात घेतले असता तिचेकडे केलेल्या चौकशी मध्ये सदर गुन्ह्यातील अपहरण करण्यात आलेली तिन वर्षाची मुलगी मिळुन आल्याने त्यांना कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे पोसई अमोल घोडके व पोलीस पथक यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोसई समीर अभंग, सफो अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोका प्रकाश मांडगे, पोकों किरण बोराडे, पोकॉ दादासाहेब टाके, पोकॉ अमोल कोतकर तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोना घोडके, पोना जढर, मपोकॉ राऊत सर्व नेम कोरेगाव पार्क पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा