Breaking

सोमवार, २८ मार्च, २०२२

निशांत क्षिरसागर,तुषार घाडगे,सुहास शिंदे भारतात प्रथम.रवि घाडगे,रत्नतेज शिरसट,कुणाल आगरकर भारतात दुसरे.११वी व १२ वी राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत टेंभूर्णीच्या चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडेमीचे यश.



निशांत क्षिरसागर,तुषार घाडगे,सुहास शिंदे भारतात प्रथम.

रवि घाडगे,रत्नतेज शिरसट,कुणाल आगरकर भारतात दुसरे.

११वी व १२ वी राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत टेंभूर्णीच्या चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडेमीचे यश.


टेंभुर्णी ( प्रतिनिधी ) अमोल भोसले

AJ 24 Taas News Maharashtra


महाड येथे दि.२४ ते २७ मार्चला संपन्न झालेल्या ११ व १२ व्या राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत टेंभूर्णीतील चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडमीचे धनुर्धर निशांत क्षिरसागर,तुषार घाडगे,सुहास शिंदे यांनी सुवर्ण पदक पटकावत भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर रवि घाडगे,कुणाल आगरकर ,रत्नतेज शिरसट या धनुर्धरांनी भारतात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
महाड (रायगड ) येथे फिल्ड आर्चरी असोसिएशन आॕफ महाराष्ट्र व फिल्ड आर्चरी आसो.आॕफ रायगड च्या वतीने ११ , १२ व्या राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत देशातील राजस्थान,हरियाना,पंजाब,आंध्रप्रदेश,तामिळनाडू,सह १८ राज्यातील जवळपास ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धा इंडियन,रिकर्व्ह,कम्पाऊं व बेअर बो या प्रकारात संपन्न झाल्या.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करताना टेंभुर्णीच्या चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडमीतील निशांत क्षिरसागर(दोन सुवर्ण),तुषार घाडगे(दोन सुवर्ण),रवी घाडगे (एक सुवर्ण,एक रौप्य) अशी पदके प्राप्त करत १४ वर्ष वयोगटात वैयक्तिक प्रथम व सांघिक मध्ये २७०० पैकी २२६५ गुणांची नोंद करत अव्वल स्थान प्राप्त केले.१४ वर्षवयोगटात बेअर बो या प्रकारातून खेळताना कुणाल अगरकर याने व १७ वर्ष वयोगटात रत्नतेज शिरसट याने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
याच स्पर्धेत सिनियर गटातून खेळाताना सुहास शिंदे याने (दोन सुवर्ण)पदक प्राप्त करत भारतात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
या सर्व खेळाडूंना चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडमीचे प्रशिक्षक मार्गदर्शक प्रा.रमेश शिरसट यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विजयी खेळाडूंचे पं.स.सदस्य धनराज शिंदे,फिल्ड आर्चरी असोशिएशनचे सुभाषचंद्र नायर,रायगड जिल्हा सचिव संतोष जाधव ,दत्तात्रय क्षिरसागर सर,नागनाथ अगरकर,आभिजीत माने,योगेश घाडगे या पालकांनी आभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा