उमरा येथे हरिनामाच्या गजरात गाथा परायण सोहळ्याची सांगता
गावातील सेवानिवृत्त भूमीपुत्रांचा सत्कार सोहळा संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा :- प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी लोहा तालुक्यातील उमरा येथे ह.भ.प.वै.परमपूज्य संभाजी मामा महाराज मारतळेकर व ह.भ.प.परमपूज्य वै.धर्मभूषण वटेमोड महाराज सिद्धतीर्थ धाम हाळदा यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त मागील सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता.शनिवारी (ता.२६) रोजी सायंकाळी गावातील मुख्यरस्त्याने पालखी मिरवणूक व (ता.२७) रोजी चंद्रकांत महाराज उस्माननगरकर यांचे काल्याचे किर्तन व गावातील विविध क्षेत्रात आपले कर्तव्य पार पडलेल्या सेवानिवृत्त भूमीपुत्रांच्या सत्कार समारंभाने कार्यक्रमाची सांगता झाली.यात दाजीराव गोविंदराव सिरसाट,उमरावसिंह राठोड,विठ्ठललराव शंकरराव सिरसाट,दादाराव दत्तराम शिंदे,गोपीराव नागोजी सिरसाट,गोविंदराव दत्तराम सिरसाट,दादाराव रामधन पवार,राजू लक्ष्मण राठोड,नारायण जोगदंड,संभाजी शंकराव जाधव,संभाजी केशव यलगंधलवार,माधव विठ्ठल इबितवार गुलाबशहा मलंगशहा शेख,गोविंद भीमराव जाधव,श्रीमती.विमलबाई अंगदराव वरपडे यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संदीप पाटील उमरेकर, गुरुराव पाटील सिरसाट,दाजीराव पाटील उमरेकर,अशोकराव सिरसाट,एम.डी.सिरसाट विठ्ठलराव सिरसाट, मधुकर सिरसाट, तेजेराव सिरसाट,गोविंदराव सिरसाट नागोराव सिरसाट पत्रकार वसंतराव सिरसाट, बालाजी सिरसाट,सचिन सिरसाट,डॉ. सूर्यकांत सिरसाट, शिवाजीराव सिरसाट,विठ्ठल परगेवार,रामराम जाधव डॉ.राजेश सिरसाट गोविंदराव पांचाळ,रामराव सिरसाट,माधव परगेवार गोविंद सोनटक्के आदींसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांची गर्दी केली होती.महाप्रसादाचा भांडारा केशवराव पाटील सिरसाट यांच्या वतीने ठेवण्यात आला होता.उमरा व परिसरातील भावीक भक्तांनी उपस्थित राहून हरिनाम कीर्तनाचा व महाप्रदाचा लाभ घेतला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा