Breaking

सोमवार, २८ मार्च, २०२२

अण्णा धोत्रे यांची विशेष गुणवंत पुरस्काराने व उत्कृष्ट नृत्य दिव्यांग कलाकार पुरस्काराने सन्मानित



अण्णा धोत्रे यांची विशेष गुणवंत पुरस्काराने व उत्कृष्ट नृत्य दिव्यांग कलाकार पुरस्काराने सन्मानित    


                                           टेंभुर्णी प्रतिनिधी :गोल्डन ग्रामीण धर्मदाय विकास प्रतिष्ठान, पुणे आणि अखिल वडार समाज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, पुणे यांच्या मार्फत  आण्णा मोहन धोत्रे यास विशेष गुणवंत पुरस्कार आणि उत्कृष्ट नृत्य दिव्यांग कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबदल त्यांचा सत्कार मी वडार महाराष्ट्राचे टेंभूर्णी कार्याध्यक्ष प्रतिक माने, तसेच  नितीन चव्हाण, सुनिल पवार, रणजित गायकवाड, योगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
आण्णा मोहन धोत्रे हा लहान पणापासून अपंग असून स्वतःच्या कर्तृत्वावर व जिद्दीच्या जोरावर एक नृत्य कलाकार म्हणून महाराष्ट्राभर नाव कोरीत एक अपंग व्यक्ती काय करू शकतो हे सिद्ध करून दाखवले आणि एक प्रेरणादायी व्यकतिमत्व म्हणून युवा पिढी समोर आदर्श ठेवला आहे. कोणत्याही प्रकारच्या कलेला वाव मिळाला पाहिजे कारण वाव मिळाल्याने त्या कलेचा आदर होतो आणि त्या व्यक्तीचा प्रोत्साहन वाढतो . एक मराठीत मन आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असे प्रतिक बंडू माने यांनी आण्णाचा सत्कार करण्याचा नियोजन केले व आण्णाचे मनोबल वाढदिवण्याचे कार्य केले तसेच आण्णाला आम्ही सर्वजण सर्वप्रकारचे मदत करून त्याची कलेला दाद देण्याचा प्रयत्न करणार आहोत.म्हणून प्रत्येक व्यक्तीने अश्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येऊन त्यांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढविले पाहिजे असे प्रखर मत सुनील पवार यांनी व्यक्त केले . आण्णा हा त्याची उपजीविका डान्स करूनच भागवत आहे.त्यामुळे याची दखल पण सरकारने घेतली पाहिजे. आण्णाला सरकारी योजनाचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा. या सत्कार प्रसंगी प्रसाद माने, विठ्ठल पवार,विशाल माने, शांतीलाल माने, किशोर पवार, समाधान जाधव,योगेश चव्हाण, सुरज पवार,प्रदीप जाधव,बापू चव्हाण अशोक चव्हाण, राजेंद्र जगताप आदीजण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा