पळसखेठा येथील जळालेल्या ऊसाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करा.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे मागणी
श्रीक्षेत्र राजुर प्रतिनीधी मनिषा मगरे
भोकरदन तालुक्यातील पळसखेडा ठोंबरे येथील परीसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड केलेला ऊस तिन दिवसांपुर्वी शाँर्ट सर्कीट होऊन जळाला आहे. या जळालेल्या ऊसाचे तात्काळ पंचनामे करुन त्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आशी मागणी राजुर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल पवार ,सतिष सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
मौजे पळसखेडा येथील शेतकऱ्यांनी पाण्याचा मुबलक साठा आसल्याने ऊस शेतीकडे वळालेला होता.मात्र विज वितरण कंपणीच्या गलथान कारभारामुळे हा ऊस शाँर्ट सर्कीट होऊन राख झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. परीसरातील 40 शेतकऱ्यांचे जवळपास 100 ते 120 एकरातील ऊस जळाला आसुन तात्काळ मदतीची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या आगोदरच आतिव्रुष्टीने या परीसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आसतांना तसेच अनुदान यादीतुन वगळले आसतांना या संकटाने घातलेलं हे थैमान आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेऊन सदरील ऊसाचे पंचनामे करुन मदत जाहीर करावी आशी मागणी करण्यात आली आहे.
या परीसरातील बळीराजा हवादिल झाला आसल्यानं मदतीची गरज आहे .हे प्रशासन व लोकप्रतिनीधीनी लक्षात घेऊन मदत करावी आशी मागणी केली आहे.
निवेदनावर अमोल पवार ,सतीष सोनवणे यांच्यासह माजी उपसभापती गजानन बापु नागवे ,सहकार बोर्डाचे चेअरमन बाबुराव मामा खरात, माजी पं.स. सदस्य जगन बाबा पवार , चांदई टे सरपंच राजु टेपले , सोमीनाथ रगडे ,किशोर सोनवणे ,क्रुष्णा नागवे, सचिन सावंत यांच्यासह ईतरांच्या सह्या आहेत .
सदरील प्रकरण कुठल्या योजनेत बसते का,किंवा शासनाची यासाठी काही विषेश बाब आहेेका या संदर्भात चाचपणी करुन संबधीत शेतकर्यांचे पंचनामे करुन शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येईल .
डाँ.विजय राठोड ( जिल्हाधिकारी जालना )
या परीसरातील शेतकरी आगोदरच आतीव्रुष्टीमुळे हवालदिल झालेला आसुन आता शाँर्टसर्कीट मुळे झालेल्या संकटाने त्रस्त झालाय
प्रशासनाने याची दखल घेऊन या
शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी
अमोल पवार सामाजिक कार्यकर्ते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा