*नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे उद्योजक व्हा : आ. सुभाष देशमुख*
लोकमंगल पतसंस्थेच्या टेंभूर्णी शाखेत खातेदार स्नेहसंवाद मेळावा उत्साहात संपन्न
AJ 24 Taas News Maharastra Network-प्रतिनिधी-भारत जगताप टेंभुर्णी
**********************************************
स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी शोधण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा नोकरी मागणाऱ्यापैकी नव्हे तर नोकरी देणारे उद्योजक व्हा लोकमंगल परिवार आपल्या पाठीशी कायम उभा राहील अशी ग्वाही माजी मंत्री तथा लोकमंगल समुहाचे संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी दिली, ते टेंभुर्णी येथे लोकमंगल
नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेदार स्नेह संवाद मेळाव्या प्रसंगी बोलत होते, पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले कि पतसंस्थेची आजवर झालेली यशस्वी वाटचाल ही सर्व कर्मचारी निष्ठेने करत असलेल्या कामामुळे व आपण सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आज रोजी पतसंस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 48 शाखामधून 930 कोटी ठेवी व 700 कोटी कर्ज वाटप करुन 1600 कोटी व्यवसायाचा यशस्वी टप्पा पुर्ण केला, मी फक्त संस्थेचा विश्वस्त म्हणून काम करतोय खरे मालक तर आपणच आहात त्यामुळे आपण निश्चिंतपणे पतसंस्थेमध्ये व्यवहार करावेत, आपण कष्टाने कमावून संस्थेत ठेवलेल्या एक रुपया ना रुपयाची वेळेवर परत करण्याची जबाबदारी विश्वस्त म्हणुन माझी राहील असा विश्वास याप्रसंगी आ.देशमुख यांनी दिला.
यावेळी प्रा. विनायक जोशी, पत्रकार सचिन होदाडे, नितीन आगलावे, अशोक खटके यांनी मोलाच्या सूचना देऊन आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी संचालक शहाजी साठे, सल्लागार अनिल मस्के, राजकुमार देशमाने, नंदराम पाटील, अनिल ढवळे, प्रा. द. रा. शिंदे, शाखेचे सोने व्याल्युवेटर राजेंद्रकुमार कोठारी, प्रगतशील बागायतदार हरिदास खताळ, टेंभुर्णीचे मा. सरपंच परमेश्वर खरात, यशस्वी उद्योजक अरुण भोसले, प्रा.दत्तात्रय ननवरे, गणेश दगडे, सुदाम लोंढे, प्रा. विनायक जोशी, दत्तात्रय आरकस, संदीप लोंढे, सुनिल दुसाने, मुन्ना तांबोळी यांचेसह बहुसंख्य सभासद, खातेदार व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विभागीय अधिकारी सतीश लोंढे यांनी केले तर आभार संचालक शहाजी आण्णा साठे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाधिकारी सतिश बोडरे, शिवाजी माने, विशांक बोचरे, विकास जाधव, दिपक धुमाळ यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा