Breaking

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

टेंभुर्णी येथे भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने मोफत शिबिरात 113 व्यक्तींची नेत्र तपासणी



टेंभुर्णी येथे भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने मोफत शिबिरात 113 व्यक्तींची  नेत्र तपासणी


AJ 24 Taas News माढा ता. प्रतिनिधी- भारत जगताप यास कडून


टेंभुर्णी(प्रतिनिधी) मोफत नेत्र तपासणी शिबिर आज सकाळी 11 वाजता भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा  माढा तालुक्याच्या वतीने विजय कोकाटे यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, टेंभुर्णी येथील महादेव गल्ली येथे  करण्यात आले होते. 

सर्वसामान्य लोकांना उपचार घेता यावेत म्हणून ही विनामूल्य आरोग्य विषयक सेवा पुणे अंधजन मंडळाचे एच .व्ही. देसाई हॉस्पिटल हडपसर, पुणे यांच्या  टेंभूर्णी विजन सेंटर मधील कार्यरत आरोग्य सेवक नेत्र चिकित्सक-. अंगद शेंडगे,  विजन सेंटर  मोबिलाईझर- सागर कोळेकर, विजन सेंटर सहायक- अजय टिपाले यांच्या कडून मोफत प्रदान करण्यात आली.


या आरोग्य विषयक सेवेचा लाभ टेंभूर्णी  व परिसरातील ४२ पुरूष व ७१ महिला अशा एकूण ११३ व्यक्तींनी घेतला, या सेवेचा लाभ घेण्यासाठी टेंभूर्णी परिसरातील लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवीला.
या विनामूल्य आरोग्य विषयक शिबिरामध्ये ,नेत्र तपासणी, रक्तदाब तपासणी तसेच रक्तातील साखर तपासणी यांचा समावेश होता. 
या शिबिराचे उदघाटन, भारतीय जनता पक्षाचे माढा तालुकाध्यक्ष व टेंभुर्णी चे नेते योगेश बाबा र  बोबडे  यांनी  केले.
त्याच प्रमाणे या मोफत नेत्र तपासणी शिबिरास भा.ज.प. बाळासाहेब ढगे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य जयवंत पोळ,औदुंबर भागवत, सुनिल निकम, माळी समाजाचे नेते नागनाथ वाघे,नानासाहेब देशमुख ,अविनाश धोत्रे, चेअरमन सुभाष इंदलकर,या. चेअरमन राहूल चव्हाण, विकास  धोत्रे .संजय  देशमुख, आकाश देशमुख .महेश अवसलकर. प्रकाश हिंगमिरे. महेश धोत्रे .आकाश हिंगमिरे प्रवीण कदम .शंभु पवार . प्रसाद इंगळे. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अतिशय शिस्तबद्ध व आनंदमय वातावरणामध्ये हे शिबिर पार पडले.शिबिराचे आयोजक  विजय  कोकाटे  यांनी उपस्थितांचे  व आरोग्य सेवकांचे आभार मानून या विनामूल्य सेवा शिबिराचा समारोप केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा