महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने उपजिल्हारुग्णालयास साहित्य भेट
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग-येथील उपजिल्हारुग्णालयास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने रुग्णालयास मोठे व लहान बकेट,मग इ. साहित्य भेट देऊन आरोग्य सेवेबाबत चर्चा व पाहणी करून आढावा घेण्यात आला,या कार्यक्रमास मनसे जनहित कक्ष व विधी विभागाचे तालुकाध्यक्ष . मतीन बाडेवाले, मनसे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण,शहर सचिव आवेज इनामदार,उपाध्यक्ष निखिल येडगे,अमीर फुलारी यांनी केले होते,यावेळी डॉ.घुगे,रुग्णालयातील स्टाफ आदि उपस्थित होते.
मनसे जनहित कक्ष-विधी विभागाचे तालुकाध्यक्ष Adv.मतीन बाडेवाले व शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा