*प्रा.जुबेर शेख यांची वक्फ संपत्ती संरक्षण विंग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निवड*
उस्मानाबाद ,वक्फ संपत्ती संरक्षण रिंग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी उस्मानाबाद* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग उच्चशिक्षित,प्रा. जुबेर शेख यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी दिले व महाराष्ट्रातील व वक्फ बोर्ड च्या जमिनीची संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान आरिफ कुरेशी यांनी केले.त्यावेळी नियुक्तीपत्र स्वीकारताना जुबेर शेख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण वक्फ बोर्डच्या जमीन जमिनीवरील अतिक्रमण हटवणे व संपूर्ण जमीन वक्फ बोर्डच्या ताब्यात देण्यासाठी तातडीने प्रयत्न करीन असे अभिवचन दिले व नियुक्ती बद्दल आभार व्यक्त केले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा