बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा, वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार:- साळुंके
सातोली परिसरात बिबट्याचा वावर वाढला; दोन कुत्रे एक कोंबडीचा फडशा
टेंभुर्णी (प्रतिनिधी ) सातोली (ता. करमाळा) गावच्या शिवारात गेल्या दहा दिवसापासून बिबट्याचा वावर दिसून येत असून अत्तपर्येंत याने बुधवार रोजी रात्री एक कुत्रा व गुरुवार रोजी दिवसा पाच वाजता कोंबडी पळवली तरीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या नाहीत त्यामुळे नागरिकातून भितीचे वातावरण पसरले आहे हे अधिकारी एखाद्या माणसाचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत काय? असा सवाल करून जर येथील नागरिकांना काही अपाय झाला तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा सातोलीचे माजी सरपंच आबासाहेब साळुंके यांनी दिला आहे
नुकत्याच बिबट्याने गेल्या तीन दिवसापूर्वी येथील कुत्र्याचा फडश्या पाडला यानंतर आता बुधवारी रात्री दुसऱ्या कुत्र्याचा बळी घेतला तर गुरुवार रोजी दिवसा कोंबडी पकडून नेहली यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत असूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याने हे माणसावर हल्ला करण्याची वाट पाहत आहेत का ? असा सवाल करून साळुंके म्हणाले जर बिबट्याला तातडीने पकडण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर वनविभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहे. दिवसभर येथील असणाऱ्या पिकांमध्ये बिबट्याने आपला मुक्काम ठोकला आहे व रात्रीचा घरासमोरील बांधलेल्या प्राण्यावर हल्ला करत आहे यामुळे नागरिक शेतात जाण्यासाठीही घाबरू लागले आहेत आत्ता तर दिवसही त्याचा वावर वाढला आहे त्यामुळे माणसावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लवकरात लवकर त्याला पकडण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणीही त्यांनी केली यावेळी सातोली येथील ग्रामस्थ येथील बंडू भोगे सुरेश गाडे सुजित गाडे शिवाजी गाडे अशोक गाडे मरीबा गाडे दत्ता भोंगे सतीश भोंगे विजय साळुंखे भरत साळुंके आदीसह सातोली परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा