सुळेवाडी येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी बाजीराव सुळे व उपाध्यक्ष पदी अर्चना ढेरे यांची बिनविरोध निवड
पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील जि प प्रा शाळेच्या नुतन शाळा व्यवस्थापन समिती निवडीसाठी अध्यक्ष पांडुरंग बिडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पालक ,शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नुतन सदस्य पदी नाथा सोलंकर, महादेव सुळे,विकास सुळे, नितीन सुळे, जयवंत सुळे, सुधीर झिंबल,राजेंद्र सुळे, महादेव पोपट सुळे, धनाजी बोडरे( शिक्षणतज्ज्ञ) ,आशाबाई बरकडे, वंदना लोखंडे, शांताबाई लोखंडे, विदया ऐवळे, यांच्या निवडी करण्यात आल्या.यामधून अध्यक्ष पदी बाजीराव सुळे तर
उपाध्यक्ष पदी अर्चना ढेरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या.यावेळी सुळेवाडी चे माजी सरपंच नाथा सोलंकर, महादेव सुळे, क्रुष्णा सुळे, मुख्याध्यापक विजया मदने, शिक्षक बाबासाहेब धोत्रे, चव्हाण सर,नष्टे मँडम, बुरांडे मँडम, बगाडे गुरुजी ,तात्यासाहेब बरकडे, प्रदीप सुळे, मधु सुळे, लोखंडे पोलीस पाटील, समाधान सुळे, सुधीर झिंबल यांच्या सह अनेक मान्यवर व पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा