कन्हेरगांव येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी भरगंडे यांची निवड .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
कन्हेरगांव तालुका माढा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी तुकाराम भरगंडे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी रतिलाल केदार यांची नियुक्ती केली.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य रामलिंग खोचरे , माढा तालुका शिक्षण सल्लागार समितीचे सदस्य माजी उपसरपंच धनंजय मोरे , शाळा व्यवस्थापन समिती चे मावळते अध्यक्ष संजय डोके पाटील , युवक नेते वैभव मोरे , संचालक गणेश माने , सानिका दुध संस्था चेअरमन दादासाहेब खोचरे , ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ लोखंडे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आण्णासाहेब मोरे , माजी ग्रामपंचायत सदस्य संपत आबा चव्हाण , पत्रकार राजेंद्र केदार , रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय डोके , समाधान चव्हाण , गजानन मोरे , संजय पाटील , माजी सरपंच उत्तम पाटील , विकास टिंगरे , उमेश डोके , जोतीराम भंरगडे , वैभव डोके पाटील , नवनाथ ताटे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी स्वाती ज्योतीराम कांबळे, सारिका नवनाथ डोके, कुमार माणिक चव्हाण ,अरुणा मारुती डोके, श्रीकृष्ण अर्जुन कांबळे,प्रतिभा कृष्णदेव केदार, बाळासाहेब अभिमान डोके, अश्विनी सावता घाडगे, मनीषा प्रकाश टिंगरे, शिक्षण प्रेमी म्हणून मंगेश रामचंद्र ताटे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी पुजा धनंजय मोरे, शिक्षक प्रतिनिधी मोतीराम तुकाराम शिंदे, सचिव मुख्याध्यापक किशोर कुमार रामचंद्र बगाडे यांची निवड करण्यात आली. या निवडीवेळी केंद्रप्रमुख मनोज पवार उपस्थित होते .
अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी सरपंच लिंबाजी मोरे , विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी डोके , माढा तालुका शिक्षण सल्लागार समितीचे सदस्य धनंजय मोरे , सोसायटीचे चेअरमन नागेश मोरे यांनी अभिनंदन केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा