Breaking

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

माढा तालुकाध्यक्षपदी पुन्हा संतोष शिंदे , कार्याध्यपदी सिध्देश्वर काळभोर तर उपाध्यक्ष पदी अविनाश इंदलकर यांची निवड*-----




*माढा तालुकाध्यक्षपदी पुन्हा संतोष शिंदे , कार्याध्यपदी सिध्देश्वर काळभोर तर उपाध्यक्ष पदी अविनाश इंदलकर यांची निवड*-----  



बेंबळे/प्रतिनिधी
 मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माढा तालुकाध्यक्षपदी शिवश्री . संतोष शिंदे यांची दि.२२ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा नव्याने निवड करण्यात आली. शिवश्री . सिध्देश्वर काळभोर यांची माढा तालुका कार्याध्यक्ष पदी तर अविनाश इंदलकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.                                                                                                               दि. २२ डिसेंबर रोजी जेऊर ता.करमाळा येथे माढा आणि करमाळा तालुक्याच्या आढावा बैठकीत वरील सर्व पदाधिकार्यांना प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, प्रदेश संघटक प्रदीप कणसे आणि पुणे विभागाचे अध्यक्ष दिपकदादा वाडदेकर यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी  निवडीचे पत्र दिले. यावेळी पुणे शहरचे कार्याध्यक्ष कैलास कणसे, सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त कार्याध्यक्ष शांतीलाल गवळी,पंढरपूरचे तालुकाध्यक्ष  रामदास घाडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.                                   प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे,प्रदेश संघटक प्रदिप कणसे, पुणे विभागाचे अध्यक्ष दिपकदादा वाडदेकर आणि जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शांतिलाल गवळी, माढा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे , पुणे विभागीय अध्यक्ष दिपकदादा वाडदेकर, प्रदेश संघटक प्रदीप कणसे आणि प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी आपले विचार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा