*मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने हनुमंत पाटुळे यांचा सत्कार*
कळंब दि.२३, कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेले व सद्यस्थितीत मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करत असलेले हनुमंत भाऊ पाटुळे यांचा पुणे येथे"संवाद यात्रा व राज्यस्तरीय आढावा बैठक"या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातु आदरणीय सचीन भाऊ साठे यांच्या हस्ते दि.१९डिसेबर रोजी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी प्रदेश अध्यक्ष आर.बी.साठे, कोअर कमिटी अध्यक्ष अँड टी.एन.कांबळे,पुणे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष विलास झोंबाडे,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश थोरात, पश्र्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजाभाऊ आडागळे, सरचिटणीस अविनाश गायकवाड, अविनाश डोलारे, सुरेश खाडे, ज्येष्ठ साहित्यिक शरद गायकवाड ,यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यातुन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा