टी.सी.देण्याकरिता अडवणूक करीत असलेल्या संस्थेवर कारवाई करा-संभाजी ब्रिगेडची मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट: गोकुंदा येथील इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल शाळेकडून विद्यार्थ्यांची टी.सी.देण्याकरिता अडवणूक करीत असल्याच्या पालकांकडून तक्रारी येत आहेत.याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तसेस गटशिक्षणाधिकारी किनवट यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले.
गोकुंदा येथील इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल या शाळेतील भौतिक सुविधा नसताना देखील ही शाळा फिस आकारत आहे.कोरोना काळात कुठलीही शाळा चालू नसतांना देखील शाळेची फिस भरून टी.सी घेऊन जा.असे या शाळेकडून सांगण्यात येत आहे.त्यामुळे पालकांची आर्थिक स्थिती डबघाईस झालेली आहे.टीसी मिळणे करिता पालकांनी अर्ज केलेले आहेत.परंतु संबंधित प्राचार्यांना शासनाच्या जी.आर नुसार टि.सी देणे बंधनकारक असताना देखील टी.सी देत नाहीत.त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडत आहे.करिता सदर प्रकरणी गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित विद्यार्थ्यांच्या टी.सी दोन दिवसात उपलब्ध करून द्याव्यात.
तसेच संबंधित शाळेची शिक्षण हक्क कायद्यानुसार चौकशी करून प्रशासकीय कारवाई करावी व शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेली आर्थिक लुबाडणूक थांबवावी.सदर कारवाई तात्काळ करावी अन्यथा सदर प्रकरणी तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे किनवट तालुकाध्यक्ष सचिन कदम यांच्या वतीने देण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा