*तुळजापुर पंचायत समिती मध्ये खांदेपालट,तुळजापुर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली या तरूण तडफदार सदस्यास उपसभापतीची संधी*
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष सदस्य श्री दत्तात्रय भास्कर शिंदे यांची तुळजापूर तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीबिन विरोध निवड करण्यात आली. तुळजापूर तालुक्याचे भाजपचे आमदार श्री राणा जगजीत सिंह पाटील यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली. अधिकाधिक सदस्यांना संधी मिळावी या उद्देशाने. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर पंचायत समितीमध्ये खांदेपालट केल्याचे समजते. सदरील निवड बिन विरोध होताच तुळजापुर तालुका भाजपच्या वतीने, व तामलवाडी पंचायत समिती गणाच्या सर्व गावांच्या वतीने नुतून उपसभापती श्री दत्ता शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तुळजापूर तालुका भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष दादा बोबडे, युवा नेते विनोद (पिठू) गंगणे, तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री यशवंत आन्ना लोंढे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री आनंद कंदले, सचिन रोचकरी, विश्वास मगर, रविदत्त मगर, सांगवी (का) चे उपसरपंच मिलिंदअंकुश मगर, पिंटू जाधव. भिमा भुईरकर. ई अदी उपस्थित होते.
************************************
तामलवाडी गणाचे कर्तव्य दक्ष सदस्य श्री दत्तात्रय भास्कर शिंदे. यांची तुळजापुर पंचायत समितीच्या उपसभापती निवड करुन आमदार राणा पाटील यांनी सर्वसामान्य सदस्यास संधी देउन मोटी जवाबदारी दिली आहे. पंचायत समिती मध्ये सर्व सामान्य माणसांच्या अडी अडचणीच्या वेळी प्रचंड आक्रमक भूमिका घेउन लोकांची कामे करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. या निवडीने तालुक्यांतील विविध विकास कामांना फायदा होणार आहे.
************************************
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या आदेशानुसार तुळजापुर पंचायत समितीच्या उपसभापती पदी बिन विरोध निवड केल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. मिळालेल्या संधीचा सर्वसामान्य लोकांसाठी काम करून संधीच सोन करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
दत्तात्रेय भास्कर शिंदे.
उपसभापती पंचायत समिती तुळजापुर.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा