ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (जळकेकर) यांच्या जाहीर किर्तनाचा कार्यक्रम
जामनेर शहरातील राधाकृष्ण हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डाॅ. ईश्वर महाजन यांना पुत्ररत्न झाल्याबद्दल त्यांनी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज ( जळकेकर) यांच्या जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा किर्तन सोहळा दि.०९/०१/२०२१ रोजी (शनिवारी) रात्री ८.३० वाजता त्यांच्या राहत्या गावी चिंचखेडा त. वा. ता. जामनेर येथील गजानन महाराज मंदिराच्या आवारात होणार आहे. तरी जामनेर तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी ह्या किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन डाॅ. ईश्वर महाजन यांनी केले आहे. डाॅ. ईश्वर महाजन हे रूग्ण सेवेबरोबरच सामाजिक कार्य देखील करत असतात. ते वेळोवेळी किर्तन, भजन, भारूड असे विविध कार्यक्रम घेत असतात.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा