Breaking

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

अल्पवयीन मुलीला मिळाला "आपलं घर" चा आधारचाईल्ड लाईन, पोलीस प्रशासन,न. प. कर्मचारी, समाजसेवक यांच्या निराधार मुलीला मिळाला आधार




अल्पवयीन मुलीला मिळाला "आपलं घर" चा आधार
चाईल्ड लाईन, पोलीस प्रशासन,न. प. कर्मचारी, समाजसेवक यांच्या निराधार मुलीला मिळाला आधार


तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे ,उस्मानाबाद



दिनांक 06 वार बुधवार सायंकाळी चार  वाजता मंदिर परिसरातून नगर परिषद च्या महिला स्वछता कर्मचाऱ्यांनी संजयकुमार बोंदर यांना  फोन केला . फोन वर त्यांनी एक तेरा ते चौदा वर्षाची मुलगी बेवारस फिरत असल्याचे सांगितले. काही क्षणात  बोंदर मंदिर परिसरात पोहोचले . महिला स्वछता कर्मचाऱ्यांनी त्या मुलीला शोधून आणले. त्यानंतर तिला नाव विचारले. गाव विचारले, तू कशी आलीस, तुला तुझ्या आई - वडिलांकडे जायचे का ?
मला माझ्या आई कडे जायचे नाही. मी कुठेही काम करते, घरकाम करते, मुलं सांभाळते पण  मला आई कडे जायचे नाही.
बाल कल्याण पोलीस अधिकारी तथा पोलीस उप निरीक्षक विकास दांडे साहेबांना सर्व हकीकत सांगितली. दांडे साहेबांनी तात्काळ पोलीस वाहनासोबत दोन पुरुष पोलीस कर्मचारी आणी दोन महिला पोलीस कर्मचारी पाठवून दिले, उस्मानाबाद चाईल्ड लाईन चे गिरी साहेब यांना सुद्धा या बाबत कळविले. उस्मानाबाद चाईल्ड लाईन चे दोन प्रतिनिधी पोलीस स्टेशनं मध्ये पुढील कारवाई साठी हजर झालें. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून चाईल्ड लाईन च्या ताब्यात दिले, पुढील कारवाई साठी बाल कल्याण समिती कडे दाखल करण्यात आले. बाल कल्याण समिती चे अध्यक्ष आश्रुबा कदम यांनी मुलीला नळदुर्ग येथील आपलं घर या ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा