*जातेगाव जिप शाळेचा पोषण आहार सील करण्याची मागणी*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
नुकत्याच समोर आलेल्या शालेय पोषण आहार घोटाळ्यातील पुरावे संपवण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे त्यामुळे जातेगाव येथे शिल्लक असलेल्या पोषण आहार सील करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी गट शिक्षणाधिकारी करमाळा यांचेकडे एक निवेदनाद्वारे केली आहे.
यात म्हटले आहे की, आम्ही मागणी करूनसुद्धा याकडे दुर्लक्ष झाले. हे रॅकेट संपूर्ण जिल्हाभरात पसरले असल्याची आमची शक्यता असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे ठोस पुरावे देखील आहेत. जिल्ह्यातील इतर शाळांनी आहार वाटप केले. फक्त जातेगाव येथील शाळेत आहार शिल्लक असल्याने तातडीने हा आहात सील करून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमार्फत याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये जो पोषन अहार पुरवठा केला जातो त्या मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातोली कंदर.जातेगाव.कामोने.या ठिकाणी स्वत जाऊन चौकशी केली आहे व तसे पुरावेही आमच्याकडे आहेत . व या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व हे जाळ पुर्ण जिल्ह्यात असेल असा अंदाज आहे तसेच दोषींवर कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
निवेदन देते वेळी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र गोडगे .ता युवा अध्यक्ष अमोल घुमरे.ता पक्षाध्यक्ष बापू फरतडे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ.ता उपाध्यक्ष तानाजी शिंदे. ता युवा उपाध्यक्ष बापू वाडेकर. व स्वाभिमानी नेते दिपक शिंदे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा