जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी वरखंड येथे विसावली
दौंड प्रतिनिधी: समीर सय्यद
वरवंड : आषाढी वारी निमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी वरवंड (ता. दौंड) येथे सायंकाळी मुक्कामी विसावली असून ग्रामपंचायत व विविध शासकीय यंत्रणांकडून स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. पालखी मुक्कामीसाठी मंदिर परिसर, वेशभूषा मंडप, आरोग्य शिबिरे, विद्युत व्यवस्था, महिला सुविधा, वाहतूक नियोजन आदी सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत.
पंढरीच्या वाटेवरील एक महत्त्वाचे मुक्कामस्थान असलेल्या ग्रामपंचायतीने वरवंड यंदा स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळ्या, सजावट केली असून पालखी
थांबणाऱ्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर मोठा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, स्वच्छता दारे, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात
आली आहे. पालखीच्या स्वागतासाठी स्थानिक महिलांची भजने, कीर्तन सेवा, रथ सजावट तसेच अन्नदान, पाणी वाटप, चहा व फळांचे वाटप अशा विविध सेवा मंडळांचे आयोजन करण्यात
आले आहे. ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते यामध्ये उत्साहाने सहभागी झाले आहेत. बुधवारी तुकोबारायांची पालखी पाटस येथील सकाळचा विसावा आटोपून बारामती दिशेने रवाना होणार आहे. वारीत
शिस्तबद्ध, आध्यात्मिक व सामाजिक भाव एकवटलेला असून वरवंड ग्रामपंचायत व दौंड प्रशासनाकडून पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मोठा सहभाग नोंदवण्यात आला आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा