Breaking

बुधवार, २९ मे, २०२४

कर्मवीर विद्यालयात व केंद्रात प्रथम आलेल्या कुमारी आरती भैस हिचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कारपिलीव



कर्मवीर विद्यालयात व केंद्रात प्रथम आलेल्या कुमारी आरती भैस हिचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस

मार्च 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बोर्डाच्या परीक्षेत 97.20. टक्के गुण मिळवून येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे कनिष्ठ महाविद्यालयात व पिलीव केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावल्यामुळे पिलीव पत्रकार संघाच्या वतीने कुमारी आरती अजित भैस व तिचे वडील अजित भैस आई सौ मोनाली भैस यांचा सत्कार व यथोचित सन्मान करण्यात आला्
 यावेळी पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल नष्टे मार्गदर्शक दामोदर लोखंडे प्राध्यापक संजय पाटील प्रमोद भैस शाहरुख मुलानी संजय रोकडे,सतीश पारसे तसेच मधुकर भैस सागर भैस ,पुनम भैस,शितल जामदार,व भैस कुटुंबातील सदस्य उपस्थित होते यावेळी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आय् टी क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून त्या दृष्टीने पुढील वाटचाल करणार असल्याचे कुमारी आरती भैस हिने सांगितले 
फोटो 
कुमारी आरती भैस हिचा सत्कार करताना अध्यक्ष अतुल नष्टे दामोदर लोखंडे प्रमोद भैस संजय पाटील शाहरुख मुलानी सतीश पारसे संजय रोकडे आदी मान्यवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा