Breaking

बुधवार, २० मार्च, २०२४

विद्युतारांच्या घर्षणामुळे ठीणग्या पडून तीन एकर ऊस व आतील ठिबकसंच जळून खाक........शनिशिराळ येथील घटना,.. सात लाखाचे नुकसान.. विद्युत मंडळाच्या गलथानपणाचा परीणाम


विद्युतारांच्या घर्षणामुळे  ठीणग्या पडून तीन एकर ऊस व आतील ठिबकसंच जळून खाक......
..शनिशिराळ येथील घटना,
.. सात लाखाचे नुकसान
.. विद्युत मंडळाच्या गलथानपणाचा परीणाम 


 बेंबळे /प्रतिनिधी.                    
          
        सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्याच्या पश्चिमेस उजनी फुगवट्यावर शनिशिराळ व आढेगाव शिवेवर  सिताराम नारायण लोकरे ,राजेंद्र सिताराम लोकरे व श्रीमती छाया विलास लोकरे यांचे गट नंबर 187/1 एक व187/2 असे  सामायिक 75 एकर बागायत क्षेत्र आहे. सोमवार दिनांक 18 मार्च रोजी रात्री  साडेनऊच्या सुमारास थोडा वारा सुटला होता त्याचवेळी लोकरे त्यांच्या शेतावरून गेलेल्या विद्युतारांच्या घर्षणामुळे ठिणग्यापडून खाली असलेल्या उसाच्या फडाला आग लागली व या आगीत लोकरे कुटुंबाचा तीन एकर ऊस व त्या उसात असलेला ठिबक सिंचन संच जळून खाक झाला. शेकडो गावकऱ्यांनी  जागृत होऊन उसात ट्रॅक्टर घालून ऊभा ऊस खाली पाडून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नाही हे पाहता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातून अग्निशामक पाण्याचा बंब मागवण्यात आला व त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. विशेष म्हणजे लोकरे कुटुंबियांचा या ठिकाणी सलग 35 एकर ऊस असून सध्या कारखान्याची ऊसतोड चालू आहे, आग आटोक्यात आली नसती तर शेजाऱ्यांचा मिळून एकूण 70 ते 80 एकर ऊस जळून खाक झाला असता व किमान एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असते. 
     या ठिकाणी विशेष बाब अशी की लोकरे यांच्या शेतावरून एकाच ठिकाणावरून तीन दिशांना वीज पुरवठा केला जातो, वीज मंडळाचे अनेक वर्ष दुर्लक्ष असल्यामुळे येथील तारा सैल झाल्या, वीज मंडळाने या ठिकाणी सुरक्षित असे जंप बसवले नाहीत, पक्षी बसला किंवा वारा सुटला तरी तारा एकमेकावर घासून घर्षण होऊन त्यातून  ठिणग्या पडतात , अशाच प्रकारे मागील दोन वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी विद्युत तारांच्या ठिणग्यापडून लोकरे यांचा किमान चार ते पाच एकर ऊस जळाला होता. वीज मंडळाला ही बाब अनेक वेळा निदर्शनास आणून देऊन सुद्धा हेतू पुरस्कर दुर्लक्ष केलेले दिसून येते ,याबाबतीत आता लोकरे कुटुंबीय फौजदारीन्यायालयात धाव घेणार आहेत, वीज मंडळाच्या गलथान कारभारास केव्हा आळा बसेल...? याबद्दल शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा