Breaking

गुरुवार, २१ मार्च, २०२४

मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेतली तर माढा तालुक्यातुन ३० हजाराने लीड देऊ-भाऊसाहेब महाडिक



मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेतली तर माढा तालुक्यातुन ३० हजाराने लीड देऊ-भाऊसाहेब महाडिक देशमुख


टेंभुर्णी/ प्रतिनिधी 
: नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुका व माढा लोकसभा उमेदवारांच्या रस्सीखेच व तिकिट मिळवण्यासाठी उमेदवारांना पक्षश्रेष्ठींना स्वताचे अस्तित्व दाखवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

महाराष्ट्र चे लक्ष लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटीलांनी माळशिरस मधून एक लाखाचे लीड देऊन आपला शब्द पाळला होता अशातच दुसऱ्या वेळेस ही  लोकसभेचे तिकीट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच जाहीर झाल्यामुळे धर्यशिल मोहिते पाटील यांचा पत्ता कट झाल्यामुळे मोहिते पाटील कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत तसेच मोहिते पाटील काय करतात याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अशाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष औदुंबर (भाऊसाहेब) महाडिक देशमुख यांनी नुकतेच पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले की माढा तालुक्यातील शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे जर मोहिते पाटीलांनी तुतारी हातात घेतली तर माढा तालुक्यातून आपण ३० हजारांहून जास्त लीड देऊ सांगितले.
औंदूबर महाडिक देशमुख यांनी शरदचंद्र पवार साहेबांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहुन माढा तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पवार साहेबांचे विचार व नव्याने मिळाले तुतारी चिन्ह पोहोचवले आहे व माढा तालुक्यात त्यांनी मोठा मतदार वर्ग आपलासा केला आहे.
आमचे नेते शरद पवार साहेब जे आदेश देतील ते आम्ही आदेशाचे पालन करुन आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असे ही सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे चित्र पाहाता व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण? समजल्याशिवाय तर्कवितर्क लावू शकणार नाही हे मात्र तेवढंच खरं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा