सोलापूर साठी उजनीतून पाणी बंद
...धरणात 44 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध
...धरण मायनस ( - उणे ) -35%
...आतापर्यंत 50 टीएमसी पाणी संपले
बेंबळे/ प्रतिनिधी फोटो
सोलापूर पंढरपूर सांगोला मंगळवेढा आदी शहरे व भीमा नदी काठावरील शेकडो गावे व वाड्यावस्त्या साठी उजनीतून भीमा नदीत ११ मार्च पासून सोडण्यात आलेले पाणी आज 14 दिवसानंतर 25 मार्च रोजी बंद करण्यात आले आहे. या चौदा दिवसात साडेसहा टीएमसी पाणी सोडण्यात आले असून कर्नाटक हद्दीतील हिळ्ळी व खानापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे , नदीवरील 27 बंधारे भरून घेतले असून यापुढे मे 24 अखेर सोलापूर साठी पाणी सोडण्यात येईल अशी माहिती जलसंपदा सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
मागील २०२३ च्या पावसाळ्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे 15 ऑक्टोबर २४ रोजी धरण 60. 66% भरले होते व साधारण ९४ टीएमसी पाणी साठा उपलब्ध झालेला होता ; सध्या 44 टीएमसी पाणी साठा शिल्लक असून आतापर्यंत पिण्यासाठी तसेच शेती, उद्योगधंदे, साखर कारखाने व वीज निर्मिती यासाठी मागील साडेचार महिन्यात एकूण ५० टीएमसी पाणी संपले आहे. सध्या धरण मायनस( -ऊणे) - 35.27% टक्के असून जलाशयात 44 टीएमसी पाणी साठ्यापैकी पंधरा टक्के वाळू मीश्रीत गाळ आहे हा गाळ काढल्यास किमान ७ ते ८ टीएमसी पाणीसाठा अधिकृत राहील असे समजते.
एकंदरीत यावर्षी उन्हाळ्यात कालवा ,बोगदा सिना माढा व दहीगाव सिंचन योजना यातून शेतीसाठी पाणी मिळणार नाही व लाखो एकर क्षेत्रातील ऊस, फळबागा इत्यादी नगदी पैशांच्या करोडो रुपये पिकांचे उत्पादन बुडणार आहे हे निश्चित .असह्य होणाऱ्या उन्हाळ्यामुळे व पाण्याच्या तीव्रटंचाईमुळे जिल्ह्यात पिण्यासाठी पाण्याची टंचाई बसणार आहे व सध्या प्रतिकूल असह्य व दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मात्र पूर्णपणे हतबल व चिंताजनक झालेला दिसून येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा