Breaking

शनिवार, ३० मार्च, २०२४

वकीलाला खोऱ्याच्या दांड्यांनी मारहाण टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सहा जनांवरती गुन्हा दाखल*



*वकीलाला खोऱ्याच्या दांड्यांनी  मारहाण टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सहा जनांवरती गुन्हा दाखल*

टेंभुर्णी/प्रतिनिधी _

माढा तालुक्यामधील टेंभुर्णी पंढरपूर रस्त्या लगत असलेले अकोले बु! येथे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता शेतीच्या वादातून वकीलाला मारहाण करण्यात आली 
याबाबत टेंभुर्णी पोलिसाकडून मिळालेली  सविस्तर माहिती अशी की बुधवार दि. 28/ 3 /2024. रोजी सकाळी साडेदहा वाजता फिर्यादी अजय दत्तात्रय वाघे वय 26 वर्ष व्यवसाय शेती व वकिली राहणार  अकोले बु ! हे आपल्या शेतामध्ये सकाळी साडेदहा वाजता ऊसाला पाणी देत असताना माझ्या शेतामध्ये दगडे का टाकली अशी विचारणा केली असता सदर आरोपी सचिन पांडुरंग वाघे, अमोल शिवाजी वाघे, शिवाजी मार्तंड वाघे, भामाबाई पांडुरंग वाघे, शैला अमोल वाघे, साक्षी सचिन वाघे, सर्व राहणार अकोले बु! यांनी सर्वांनी सदर फिर्यादीला खोऱ्याच्या दांड्याने दगडाने काठीने हाताने लाथा बुक्क्याने मारहाण केली व उसामध्ये दगडे टाकून उसाचे नुकसान केले यामध्ये सदर फिर्यादी जखमी झाले असून म्हणून त्यांनी वरील आरोपी विरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे टेंभुर्णी पोलीस ठाणे येते दिनांक.29/3/2024 रोजी गुन्हा  दाखल- 163/2024 भादवि 324, 323, 427, 143, 147, 148, 149, 504, 506 , महा. पो. का. क 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सरडे हे करीत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा