Breaking

शनिवार, २३ मार्च, २०२४

फुटजवळगाव येथील अज्ञातांनी केली शेळ्यांची चोरी.



फुटजवळगाव येथील अज्ञातांनी केली शेळ्यांची चोरी.



टेंभुर्णी (प्रतिनिधी):- 22 मार्च 2024 रोजी रात्री साडेबारा वाजता साडेचारच्या दरम्यान शंकर वस्ती जवळगाव तालुका माढा येथे गणेश बलभीम शंकर यांच्या घरासमोरील बांधलेल्या शेळ्यांचा दोर कापून अज्ञात चोरट्यांनी 35 हजार रुपये किमतीच्या शेळ्या व मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे अशी माहिती अमुकसिद्ध गोरख शंकर यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, 35,000 येणेप्रमाणे वरील वर्णनाची व किंमतीचे शेळ्या व मोबाईल हे दि 22/03/2024 रोजी रात्रो 00/30 वा.ते 04/30 वाचे दरम्यान मौजे शंकरवस्ती फुटजवळगाव येथील फिर्यादी गणेश शंकर व त्यांचे शेजारी राहणारे अमुकसिध्द गोरख शंकर यांचे घरासमोरील बांधलेल्या शेळ्या दावे कापून अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय, मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे. म्हणून अज्ञात चोरटयाविरुध्द भा द वि 379/34 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेचा तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल आतार हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा